कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी भारत सातपुते यांचे मराठी भाषेचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, “भाषा एक सामाजिक संस्था असून ती आपल्यावर संस्कार करण्याचे काम करते. मराठी भाषेचा इतिहास आणि साहित्यिक परंपरा समृद्ध आहे. आद्यकवी मुकुंदराज, महात्मा चक्रधर स्वामी,संत ज्ञानेश्वर,तुकाराम यांचे साहित्य आणि त्यांच्या लेखनातून मराठी भाषेचा वारसा दिसून त्यांनी दर्जेदार ग्रंथनिर्मिती केली आहे, म्हणून केंद्र सरकारने मराठीला भाषेला अभिजात दर्जा दिला आहे.आता दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उपयोजन करणे गरजेचे आहे.त्यामुळे भाषा विकासाला गती मिळणार असून तिचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. व्यासपीठावर डॉ.संजय कांबळे (अधिसभा सदस्य, डॉ बाबासहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर),उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान होते. भारत सातपुते म्हणाले की, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाची संस्कृती आणि आत्मा आहे. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, वारसा आणि साहित्य आहे. मराठी भाषेचे महत्त्व विशद करताना विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. फक्त त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे. तसेच यावेळी त्यांनी काही प्रकाशित ग्रंथ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.दादाराव गुंडरे यांनी केले. सप्ताहाच्यानिमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. ईश्वर राठोड यांनी मानले.यावेळी प्रा.ए.आर.मुखेडकर,प्रा.डॉ.ज्ञानेश चिंते,प्रा.डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.शाहरुख शेख, प्रा.एच. जे. काझी, प्रा.डॉ. बालाजी वाघमारे, प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा.डॉ.पी. एन वाकडे तसेच अधीक्षक प्रा.हनुमंत जाधव यांनी कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड