डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन, महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देऊन दोषीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
कळंब – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर तिवारी राकेश या व्यक्तीने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कळंब शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनातून महामहिम राष्ट्रपती, भारत सरकार यांना उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक कळंब यांच्या मार्फत निषेध निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या अत्यंत प्रतिष्ठित आणि घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर हल्ला करणे हे केवळ व्यक्तिवर नव्हे तर भारतीय राज्यघटनेवरच घाला घालण्याचे देशविघातक कृत्य आहे.मनुवादी,जातीयवादी आणि विकृत मनोवृत्ती असलेल्या तिवारी राकेश या ईसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याची वकीलीची सनद रद्द करावी, अशी तीव्र मागणी या आंदोलनातून करण्यात आली. दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात सतपाल बनसोडे, अनिल हजारे,सुनील गायकवाड, राहुल हौसलमल आणि बजरंग ताटे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात राजाभाऊ गायकवाड, शिवाजी सिरसाट, अमर गायकवाड, धनंजय ताटे, रणदिवे सुमीत, मुळे राहुल, संतोष भांडे, किशोर वाघमारे, सुरज वाघमारे, लखन गायकवाड, आकाश गायकवाड,डॉ.शंकर कांबळे,प्रकाश खंडाळे,अॅड. विकास राऊत,कैलास लोंढे,प्रमोद ताटे,आप्पासाहेब हजारे,सायस हजारे,ताज खाँ पठाण,मुकेश गायकवाड,शितल सोनवणे आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनातून संविधानावरचा विश्वास दृढ राखत, “संविधानाचा अपमान करणाऱ्यांना देशात स्थान नाही” असा इशारा देण्यात आला.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर