February 9, 2026

शेतमजुरांना आर्थिक मदत व अन्न धान्य तात्काळ वाटप करा

  • लोकहीत सामाजिक विकास संस्थेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
  • कळंब – धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे झाली आहे.अतिवृष्टीच्या पावासामुळे शेतातील माती पिकासोबत वाहून गेली आहे.यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शेतीवर अवलंबून असलेले शेतमजुरांन वर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश गावा गावात घरात पाणी शिरून घरातील भांडे , अन्नधान्य,व कित्येक शेतकऱ्यांनचे जनावरे पाण्यात वाहून गेले आहे . अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने सर्वेक्षण करून तात्काळ मदत देण्यात यावी.हातावर पोट असणाऱ्या मंजूराना दिवाळी सण साजरा करण्यासाठी शासनाने तात्काळ जिवनाश्यक साहित्याची व आर्थिक मदत करावी.संपुर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा फिस माफ करण्यात यावी.अतिवृष्टीच्या पाण्यामुळे बहुतांश गावात पिण्याचे पाणी दुषीत झाले आहे.अशा ठिकाणी शुध्द पाण्याची सोय करण्यात यावी.विधवा एकल महिलांना जिवनाश्यक साहित्याची वाटप करण्यात यावी अशी मागणी लोकहीत सामाजिक विकास संस्थेचे संचालक अमर ताटे,सुहास शिदे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे मागणी केली आहे.
error: Content is protected !!