March 26, 2026

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १४ ऑक्टोबरला

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जुलै २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील त्रैमासिक बैठक येत्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
    या बैठकीत भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारी व अभिकथनांवर चर्चा करण्यात येणार आहे.नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह सादर करणे आवश्यक असून,त्या संबंधित तालुक्यातील तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे अथवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे दाखल करता येतील.जर संबंधित विभागाने किंवा तालुकास्तरीय समितीने आवश्यक ती कार्यवाही केली नसेल,तर अशा तक्रारी थेट जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करता येतील,असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    जिल्हा प्रशासनाने सर्व कार्यालय प्रमुख,अशासकीय सदस्य तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या बैठकीसंदर्भात नोंद घ्यावी,असे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!