धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 71 कारवाया करुन 49,750 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-दिपक भिमराव पवार, वय 26 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.27.09.2025 रोजी 18.40 वा. सु जळकोट येथे अनिल केरबा कदम यांचे पत्र्याचे शेडचे बाजूला तुळजापूर येथे अंदाजे 2,100 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.27.09.2025 रोजी 12.30 तेते 13.50 वा. सु.उमरगा पो ठाणे हद्दीत 3 ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-निलेश रामा कांबळे, वय 32 वर्षे, रा. रुपीनगर रोड संजय हॉटेल जवळ पुणे ह.मु. जहागीर ए ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.50 वा. सु. उमरगा येथील पतंगेरोड येथील भाजी मार्केट बाजूला पानटपरी मध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,020 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-दत्तु रामराव मदने, वय 76 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 12.30 वा. सु.याटे कॉम्पलेक्स जवळ मोकळ्या जागेत उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 720 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-सुर्यकांत कल्याण्अप्पा आवटे, वय 39 वर्षे, रा. खजुरी ता. आळंद जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक हे 12.30 वा. सु.कसबी बॉर्डर येथे मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढोण पोलीसांनी दि.27.09.2025 रोजी 17.30 तेते 18.05 वा. सु.शिराढोण पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जावेद मौनोद्दीन शेख, वय 35 वर्षे, रा. संभाजी चौक शिराढोण, बाळासाहेब सोनके रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे 18.05 वा. सु. तलाठी कार्यालया समोर दर्गा रोड शिराढोण लगत कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 14,250 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-शरद लक्ष्मण शिंदे, दादाराव कोंडीबा पवार, बापु कोंडीबा पवार, दत्तु कोडींबा पवार, सर्व रा. मंगरुळ ता. कळंब जि.धाराशिव हे 17.30 वा. सु. मारुती मंदीराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत मंगरुळ येथे तिरट मटका जुगाराचे साहित्य एकुण 2,570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.27.09.2025 रोजी 15.00 वा. सु.तुळजापूर पो ठाणे हद्दीत जुनी प्राताप टॉकीज समोर तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुधाम सुनिल देवकर, वय 34 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.00 वा. सु. जुनी प्राताप टॉकीज समोर तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 2,070 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : दि.16.09.2025 रोजी 18.00 ते दि.17.09.2025 रोजी 09.30 वा. दरम्यान जळकोटवाडी शिवारातील सुदाम दिगंबर लष्करे यांचे शेतातील घराजवळ ठेवलेले वीज वाहिन्या ओढण्याकरीताच्या तारेचे 09 किमी लांबीची ॲल्युमिनीअम विद्युत वाहिनी तार अंदाजे 49,950₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दलबहादुर राम प्रताप, वय 35वर्षे, रा. गणंशपुर मजरे कुश्महुरा चंदापुर ता. महाराजगंज जि. रायबरेली राज्य उ.प्रदेश ह.मु. जळकोटवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.27.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अजीम अब्दुल सत्तार कुरेशी, वय 38 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे नवीपेठ मेर रोड नळदुर्ग येथील गॅलक्सी मोबाईल ॲन्ड ईलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे पत्र्याचे नटबोल्ट काढून पत्रा उचकटून पी.ओ.पी तोडून अज्ञात व्यक्तीने दि 25.09.2025 रोजी 21.15 ते दि. 26.09.2025 रोजी 09.30 वा. सु. आत प्रेवश करुन दुकानातील व्हीवो कंपनीचे 02 मारेबाईल फोन व रोख रक्कम 43,000₹ असा एकुण 1,34,508₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजीम अब्दुल कुरेशी यांनी दि.27.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334, 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-नईमोद्दीन रब्बीउलहक्क मलीक, वय 42 वर्षे, जैनुद्दीन रब्बीउलहक्क मलीक, वय 44 वर्षे दोघे रा. साइखाला बाजार दुमजुड कलकत्ता यांनी दि.04.07.2025 रोजी 11.00 वा. सु. सराफ लाईन उमरगा येथील मलिक ज्वेलरी आर्ट या दुकानात फिर्यादी नामे- अजमोद्दीन इसाक शेख, वय 40 वर्षे, रा. औटी प्लॉट डिग्गी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे जुने दागीने देवुन नविन डिझाइनचे दागिने तयार करण्यासाठी स्वतासाठी स्वताजवळील 26 तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 4,00,000₹ नमुद आरोपींना देवून सुध्द आरोपींनी नविन दागीने तयार करुन न देता फिर्यादी यांनी दिलेले दागीने व पैसे परत न करता फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजमोद्दीन शेख यांनी दि.27.09.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे उमरगा येथे भा.न्या.सं.कलम 316 (2),318(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान