March 26, 2026

प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.रामकृष्ण लोंढे यांचे मुंबई रेल्वे प्रवासात हार्टअटॅकने दुःखद निधन

  • कळंब- कळंब तालुक्यातील ज्ञान, सेवा आणि समर्पणाने वैद्यकीय क्षेत्रात बाल रुग्ण सेवा तसेच कळंब शहराचा विकास व सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या माध्यमातून सतत कार्य करणारे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.रामकृष्ण लोंढे ( ७४ ) यांचे मुंबई रेल्वे प्रवासा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने १४ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले.दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी कळंब येथे आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत कळंब रेल्वे नकाशावर यावे तसेच कळंब शहरासाठी रिंगरुट व विविध विकास प्रश्नावर डॉ.लोंढे यांनी आपल्या भाषणातून जोरदार मागणी केली होती,यानंतर ते मुंबईकडे रेल्वे प्रवासाने निघाले व प्रवासादरम्यान रेल्वेत हार्टअटॅकने निधन झाल्याची घटना घडली.डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी बाल रुग्णांच्या सेवेबरोबरच रोटरी क्लब डिस्टिक चेअरमन, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष,रेल्वे कृती समिती अध्यक्ष,कळंब उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य या माध्यमातून मोठे काम केले आहे त्यांच्या पार्थिवावर सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० कळंब येथील मांजराकाठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात मुलगा डॉ.अभिजीत लोंढे, बालरोग तज्ञ,मुलगी डॉ.संयोगिता लोंढे ,सून डॉ.दिपाली लोंढे,व नातवंडे असा परिवार आहे.
    कळंब शहराच्या विकास प्रश्नासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला,त्यांच्या निधनाने कळंब शहरात सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!