May 11, 2026

शुभ मुहूर्त

  • गणेश चतुर्थी २०२५ ला अद्भूत शुभ दुर्मिळ योग
  • यंदाची गणेश चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार,अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे.यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत.
  • गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी
  • पंचांगानुसार,भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात भगवान गणेशाचा जन्म झाला होता.ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये,हा उत्सव ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो.२०२५ मध्ये,
  • गणेश चतुर्थी उत्सव बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सुरू होईल. चतुर्थी तिथी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १:५४ वाजता सुरू होईल आणि २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३:४४ वाजता संपेल.
  • ‘या’ शुभ मुहूर्तावर गणपतीला आणा घरी
  • ज्योतिष शास्त्रानुसार,श्री गणपती बाप्पाच्या पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त हा दिनांक २७ ऑगस्ट २०२५ बुधवार, सकाळी ११:०५ वाजेपासून ते दुपारी ०१:४० वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिलीय.
  • भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे.भाद्रपद शुद्ध चतुर्थी
  • समाप्ती: बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०३ वाजून ४३ मिनिटे.चंद्रास्तकाल: बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ०९ वाजून २७ मिनिटे.
  • भाविकांना बाप्पाच्या पूजेसाठी अडीच तासांचा शुभ कालावधी मिळणार आहे.
  • संकलन –
    अनिल देशपांडे बार्शी
error: Content is protected !!