March 26, 2026

विद्याभवन हायस्कूलच्या मुलींचा तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा झेंडा

  • कळंब (विशाल पवार) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील विद्यार्थिनींनी डिकसळ येथे झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
    विद्यालयातील १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून कळंब तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय स्पर्धेत करणार असल्याचा आनंद आहे.
    विजयी संघात कु.सृष्टी इंगोले, प्राजक्ता कुंभार,नेहा माने,प्रणिता कदम,सोनम पांचाळ,ज्ञानेश्वरी यादव,श्रुती वाघमारे,समीक्षा आव्हाड,श्रावणी पवार,समीक्षा जाधव व संस्कृती शिंदे यांचा समावेश आहे.या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.
    या विजयी संघाला सहशिक्षक सूरज मडके व बंटी मडके यांनी विशेष मार्गदर्शन केले.विजेत्या खेळाडूंना पुढील जिल्हास्तरीय सामन्यासाठी सचिव डॉ.अशोक मोहेकर,मुख्याध्यापक व्यंकट कुंभार व शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
error: Content is protected !!