March 26, 2026

जिल्ह्यात प्रधानमंत्री व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत मोठी प्रगती

  • घरकुलांच्या लाभार्थ्यांना दिलासा
  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत विविध गृह योजनांमधून हजारो कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे.केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२१-२२ या कालावधीत एकूण १२ हजार ८०९ उद्दिष्टांपैकी तितक्याच घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ११ हजार ८४६ (९२.५ टक्के) घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.याशिवाय २०२४-२५ व २०२५-२६ करिता मिळालेल्या ६९ हजार ७७१ उद्दिष्टांपैकी ६५ हजार ९३६ (९४.५० टक्के) घरकुले मंजूर झाली आहेत.अलीकडेच झालेल्या आवास सर्वेक्षण २०२४ अंतर्गत १ लक्ष ५ हजार ४९१ नवीन कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.
    राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत सन २०१६-१७ ते २०२३-२४ दरम्यान १९ हजार ४१४ उद्दिष्टांपैकी तितक्याच घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून १४ हजार ३४४ घरकुले पूर्ण झाली आहेत.उर्वरित घरकुले बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत. याशिवाय यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत ३०४७ उद्दिष्टांपैकी ३७४७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
    आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या शबरी आवास योजनेत ५४९ उद्दिष्टांपैकी ५४९ मंजुरी देण्यात आली आहे.त्यापैकी ३४३ घरकुले पूर्ण झाली आहेत.तर मोदी आवास योजना २०२३-२४ अंतर्गत २२७४ घरकुलांना मंजुरी मिळाली असून आतापर्यंत १०४७ घरकुले पूर्ण झाली आहेत.
    या सर्व योजनांमुळे धाराशिव जिल्ह्यात हजारो कुटुंबांचे पक्के घराचे स्वप्न साकार झाले आहे.शासन व स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे काही लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळाले तर काहींचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.
error: Content is protected !!