September 20, 2026

साईराम मल्टीस्टेट मध्ये कोट्यावधीच्या ठेवी अडकल्या; चेअरमन,संचालक नॉट रिचेबल

  • धाराशिव (जयनारायण दरक) – राष्ट्रीयकृत बँका चांगले व्याजदर देत नसल्याने खातेदार खाजगी मल्टीस्टेट बँकेमध्ये जास्त व्याज दराच्या आशेने आपल्या पैशाची गुंतवणूक करत असतात. मात्र खाजगी मल्टीस्टेटला कोणी वाली नसल्याने खातेदारांना लुबाडण्याचे काम सुरू आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार कळंब येथे समोर आला आहे.
    एक एक रुपया जमा करुन नागरिकांनी मल्टिस्टेट बँकेत जमा केले पण गेल्या चार दिवसापासून बँक बंद असल्याने ठेवीदारासह सोने तारण करणारे नागरिक परेशान झाले आहेत.
    कळंब येथील साईराम अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रे सो लि बीड ही खाजगी संस्था शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती मात्र गेल्या दोन ते चार दिवसांपासून ही मल्टिस्टेट बंद असल्याने ठेवीदार, सोने गहानदार, पिग्मी भरणारे छोटे व्यापारी यांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत असल्याने या ग्राहकांना मल्टिस्टेट पैसे वापस देणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
    कळंब शहरातील नागरिकांनी मोठा विश्वास ठेऊन या मल्टीस्टेट मध्ये पैशाची गुंतवणूक केली होती.अचानक हि मल्टीस्टेट बंद झाल्याने ठेवीदार व अन्य गुंतवुणूकदार यांच्या पैशाची जवाबदारी घेण्यासाठी या संस्थेचे चेअरमन,बँकेतील कर्मचारी सर्व जण गायब झाले असल्याने मोठा तेढ निर्माण झाला आहे.
    बँकेतील कांही कर्मचारी मोजक्या लोकांचे फोन उचलतात आणि बँकेची १२ कोटीची मालमत्ता विक्री झाली असून लवकरच पैसे मिळतील असे खोटे आश्वासन देत आहेत.शाखेतील कर्मचारी कुणाच्याही संपर्कात नसल्याने ठेवीदारांच्या ठेवीचे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण आहे.
    साईराम अर्बन मल्टीस्टेट मध्ये एकूण तीन पिग्मी प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली होती. या तीन प्रतिनिधीचे एकूण पाचशे ते साडेपाचशेच्या आसपास पिग्मीचे खातेदार होते यांचे दररोज चे कलेक्शन हे २० लाखाच्या आसपास होत होते. मात्र या पिग्मी प्रतिनिधींना मल्टीस्टेट बंद असल्याने पिग्मीचे खातेदार नाहक त्रास देत आहेत. या संस्थेचे चेअरमन परभने हे सध्या नोट रीचेबल असल्याने ठेवीची गुंतवणूक करणारे , सोने तारण करणारे व इतर ठेव ठेवणाऱ्या खातेदाराच्या पैशावर संकट आले आहे. याबाबत अद्यापही चेअरमन परभणे यांनी कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही
error: Content is protected !!