धाराशिव – माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडविणे तसेच विविध सैनिक कल्याणकारी योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘महा DBT’ प्रणालीतून माजी सैनिक व त्यांच्या विधवांची माहिती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विशेष दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यांत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा कल्याण संघटक हे संबंधित तहसिल कार्यालयात भेट देऊन नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक माजी सैनिक व विधवांनी खालीलप्रमाणे आपल्या तालुक्यानुसार दिलेल्या वेळेस उपस्थित राहावे.
दौऱ्याचे वेळापत्रक – उमरगा ०५ ऑगस्ट २०२५ मंगळवार ११.०० ते दुपारी १ वाजता. लोहारा ०५ ऑगस्ट २०२५ मंगळवार दुपारी ३.०० ते ५ वाजतापर्यंत,कळंब ०६ ऑगस्ट २०२५ बुधवार सकाळी ११ ते दुपारी १ वाजतापर्यंत.वाशी ०६ ऑगस्ट २०२५ बुधवार दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत,भूम ०७ ऑगस्ट २०२५ गुरुवार सकाळी ११ ते दुपारी १ वाजतापर्यंत.परंडा०७ ऑगस्ट २०२५ गुरुवार दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत,तुळजापूर ०८ ऑगस्ट २०२५ शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी १ वाजतापर्यंत,धाराशिव ०८ ऑगस्ट २०२५ शुक्रवार दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत असा असणार आहे. उपस्थित राहताना आवश्यक कागदपत्रे,आधारकार्ड,PAN कार्ड, माजी सैनिक / विधवा ओळखपतत्र ज्यांनी अजूनही महासैनिक पोर्टलवर आपली नोंदणी केलेली नाही,त्यांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपली माहिती अद्ययावत करावी.ही प्रक्रिया विविध शासकीय लाभ योजनांचा लाभ थेट मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला