August 8, 2025

विद्याभवन प्राथमिकच्या विद्यार्थ्यांची नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये घवघवीत कामगिरी

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या विद्याभवन प्राथमिक विद्यालय,कळंब येथील विद्यार्थ्यांनी दि.१३ जुलै २०२५ रोजी बीड येथे पार पडलेल्या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये अत्युत्तम कामगिरी करत मराठवाडा विभागात आपले वर्चस्व सिद्ध केले.
    या स्पर्धेत एकूण चार इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले ते पुढीलप्रमाणे –
    इयत्ता १ली – आरोही ऋषिकेश साळुंखे – 99/100 – मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक,विरेंद्र विकास कदम – 93/100 – चौथा क्रमांक,श्रीशा पंडीत जाधवर – 84/100 – पाचवा क्रमांक
    इयत्ता २री – स्वानंद सुनील देशपांडे – 99/100 – तिसरा क्रमांक,शिवांश गणेश गपाट – 91/100 – सातवा क्रमांक,प्रज्वल प्रविण चंदनशिव – 74/100 – बारावा क्रमांक
    इयत्ता ३री – बिलाल वसीम सय्यद – 100/100 – प्रथम क्रमांक,यशराज विलास जगताप – 94/100 – सहावा क्रमांक
    इयत्ता ४थी – पूर्वा राहुल देवकर – 100/100 – प्रथम क्रमांक,आराध्या बाळकृष्ण थोरबोले – 100/100 – द्वितीय क्रमांक,ईश्वरी विक्रम चोंदे – 99/100 – चौथा क्रमांक,शिवांजली ऋषिकेश आवाड – 96/100 – पाचवा क्रमांक,या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष लाटे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
    शाळेच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनपद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फलित असून,या यशामुळे शाळेचे नाव उज्वल झाले आहे.
error: Content is protected !!