धाराशिव (जिमाका) – कारगिल युद्धाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त धाराशिव येथे ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला.सन १९९९ मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोरांविरोधात शौर्याने लढून विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या निमित्ताने शहीद जवानांचे बलिदान स्मरून समाजात राष्ट्रनिष्ठेची भावना दृढ करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कॅप्टन जे. एस.मेहता (निवृत्त),ऑफिसर इनचार्ज,ई.सी.एच.एस.,धाराशिव यांनी भूषवले.यावेळी वीरनारी,माजी सैनिक,युद्धविधवा,शासकीय कर्मचारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ‘अमर जवान’ स्मारक प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कॅप्टन मेहता आणि वीरपत्नी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.त्यानंतर इतर मान्यवर,माजी सैनिक आणि उपस्थित नागरिकांनीही पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात ५ वीरपत्नी/वीरमाता/वीरपिता,३५ माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व १३ शासकीय कार्यालयातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.त्यांना शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.गुरुनाथ कुलकर्णी (वरिष्ठ लिपिक) यांनी प्रस्तावना केली,ऋत्विज क्षीरसागर (कल्याण संघटक) यांनी आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला