कळंब — कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,कळंब येथील इयत्ता ८ वी मधील ५ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षीप्रमाणे उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्तीस पात्रता मिळवली आहे.यात प्रांजल दीपक देशमुख,समृध्दी सचिन सलगर, अनिशा दत्ता नांदे,ऋतुजा दीपक बावणे,अथर्वराज हनुमंत मडके यांचा समावेश आहे. राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी संपूर्ण तालुक्यातून केवळ २३ विद्यार्थी निवडले गेले आहेत,आणि त्यापैकी ५ यशस्वी विद्यार्थी केवळ कॅनव्हास स्कूलमधून असल्याची बाब शाळेसाठी आणि पालकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास,पालकांचा ठाम पाठिंबा,शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचा अभ्यासकेंद्रित दृष्टिकोन हे सर्व घटक महत्त्वाचे ठरले.त्यांनी अभ्यासक्रम नियोजन, वेळापत्रक व्यवस्थापन,चाचण्या आणि प्रेरणादायी सत्रांद्वारे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. याचबरोबर विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रेरित करण्याचे श्रेय संतोष माळी, उपशिक्षणाधिकारी (योजना) आणि सुशील फुलारी,शिक्षण विस्तार अधिकारी,बीट ईटकुर यांना देखील जाते. शाळेचे संचालक आणि शिक्षकवृंदांनी या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे,त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. “विद्यार्थ्यांचा हा यशस्वी टप्पा केवळ शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण कळंब तालुक्यासाठी प्रेरणादायक ठरेल,” असे शाळेचे प्रतिनिधी म्हणाले. शाळेने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी