धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08जुलै रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 258 कारवाया करुन 2,27,650 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-शाहुराज नरसिंग मुळे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.08.07.2025 रोजी 19.15 वा. सु सलगरा दिवटी गावातील चौकात असलेल्या दिलखुश हॉटेलच्या समोर अंदाजे 840 ₹ किमंतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-राणुबाई खुबा राठोड, वय 60 वर्षे, रा.केसेगाव तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.08.07.2025 रोजी 11.30 वा. सु केशेगाव तांडा येथे अंदाजे 2,100 ₹ किमंतीची 21 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
शिराढोण पोलीस ठाणे: आरोपी नामे-आण्णासाहेब माणिक लोंढे, वय 25 वर्षे, रा. आवाडशिरपुरा ता.कळंब जि. धाराशिव हे दि.08.07.2025 रोजी 17.20 वा. सु आपल्या राहत्या घराचे समोर अंदाजे 3,000 ₹ किमंतीची 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-राहुल विलास मुद्दे, वय 38 वर्षे, रा. झोरी गल्ली धाराशिव ता. जि.धाराशिव हे दि.08.07.2025 रोजी 19.20 वा. सु धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोड लगत अलीम बिर्याणी सेंटरच्या बाजूला मोकळ्या जागेत धाराशिव येथे अंदाजे 1,900 ₹ किंमतीची 19 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-किरण तायाप्पा शिंदे, वय 38 वर्षे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.08.07.2025 रोजी 08.00 वा. सु. इंदापुर शिवारातील भैरवनाथ साखर कारखान्या समोर हायवे रोडवर पिकअप क्र एमएच 13 डिक्यु0706 मध्ये गोवंशीय जातीचे 3 जर्सी गायी 1 खिल्लार जातीची गाय व 1 गिर गाय असे एकुण वाहनासह 3,50,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जनावरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(अ), 5(ब), 9(ब),11 प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1), 11(1) (अ), 11(1) (एफ) 11(1) (एच),11(1)(आय) सह प्राण्यास परिवाहन अधिनियम कलम 47, 54, 56अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :पिकअप वाहन क्र एमएच 11 बीएल 4409 चे चालकांनी दि.08.07.2025 रोजी 04.30 वा.सु. वारदवाडी ते भुम जाणारे रोडवर सिमा दाजीबा गुंजाळ यांचे शेताजवळ नमुद वाहनामध्ये गोवंशीय जातीचे 4 जर्सी गायी व 22 वासरे असे एकुण 2,10,000₹ किंमतीचे वाहनासह 5,10,000₹ किंमतीचे गोवंशीय जनावरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(अ), 5(ब), 9(ब),11 प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(ए), 11(1) (एफ) 11(1) (एच),11(1)(आय) सह प्राण्यास परिवाहन अधिनियम कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :आयशर टेम्पो क्र एमएच 13 एएक्स3132 चे चालकांनी दि.08.07.2025 रोजी 09.45 वा.सु. शासकीय दुध डेअरी भुम येथे नमुद वाहनामध्ये गोवंशीय जातीचे 12 जर्सी गायी व 4 वासरे असे एकुण 1,84,000₹ किंमतीचे वाहनासह 8,84,000₹ किंमतीचे गोवंशीय जनावरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 9,5 प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(ड),(इ)(ई) (ऐ)(ठ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दशरथ सुग्रीव गोरे, वय 27 वर्षे, रा. रा. कारंजा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.07.07.2025 रोजी 18.20 वा.सु. दुकान बंद करुन त्यांचे मोटारसायकलवरुन परंडा शिवाररातील शेताकडे परंडा कुर्डूवाडी रोडने जात असताना बिगर नंबरच्या पांढरे रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधील तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे मोटार सायलला पाठीमागून धडक देवून त्यांचे डोळ्यात मिर्ची पुड टाकुन लोखंडी रॉडने मारहाण करुन
दशरथ गोरे यांचे जवळील 50 ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने व रोख रक्कम 47,000₹सॅकसह असा एकुण 3,97,000₹ किंमतीचा माल बळजबरीने हिसकावून नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दशरथ गोरे यांनी दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309 (6), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सुनिल महादेव कोकणे, वय 37 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांचे आष्टाकासार येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.07.07.2025 रोजी 19.00 ते दि.08.07.2025 रोजी 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दुकानातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने, 1 किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम 60,000 ₹ असा एकुण 1,68,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिल कोकणे यांनी दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मोहीन कलीम सुबेकर, वय 24 वर्षे, रा. खेड ता. लोहारा बु जि. धाराशिव यांची होंडा कंपनीचे ग्रे रंगाची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 8003 अंदाजे 20,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने दि.27.06.2025 रोजी 14.30 ते 16.00 वा. सु. जिंदावली मोबाईल शॉपी समोर लोहारा येथुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहीन सुबेकर यांनी दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अशोक बाबुराव पाटील, वय 70 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांची माडज शिवारातील शेत सर्वे नं 206 मधील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार पाच एचपी लक्ष्मी लाडा कंपनीची एल टी एल के कंपनीचे तीन स्टार्टर व केबल सह 6,500₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने दि.06.07.2025 रोजी 22.00 ते दि. 07.07.2025 रोजी 06.00 वा. सु. चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक पाटील यांनी दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-जिजाबाई शिवराम आहीरे, वय 73 वर्षे, रा. अभिनंदन हौसींग सोसायटी पैठण रोड छत्रपती संभाजी नगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर या दि.08.07.2025 रोजी 11.30 वा. सु. श्री. तुळजाभवानी मंदीर तुळजापूर येथे देवदर्शनासाठी आल्या असता मंदीर परिसरात 11.30 वा. सु. जिजाबाई आहीरे यांचे गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जिजाबाई पाटील यांनी दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-शहाजी भानुदास शिंदे, संदीप शहाजी शिंदे, सचिन शहाजी शिंदे, अश्विनी संदीप शिंदे, सर्व रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.05.07.2025 रोजी 06.00 वा. सु. सरमकुंडी येथील शेत गट नं 143 मधील हॉटेल विशाल चे समोर पत्राचे शेड मध्ये फिर्यादी नामे-कुसूम गणपत शिंदे, वय 65 वर्षे, रा.सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव यांना व त्यांचा नातु विशाल शिंदे यांना नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच हॉटेल मधील सामानाचे नुकसान करुन सर्व्हीस रोडचे मोकळ्या जागेत टाकुन जाटून टाकले जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कुसूम शिंदे यांनी दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथक खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 326(एफ),352, 115(2),351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
आंबी पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे-स्वप्निल हरिदास टिपरे, वय 24 वर्षे, रा.धनेगाव ता. जामखेड जि. अहमदनगर हे दि.09.05.2025 रोजी 15.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 14 एलडब्ल्यु 8927 वरुन जात होते. दरम्यान आरोपी स्वप्निल टिपरे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून आंबी ते पाथ्रुड जाणारे रोडवर आनंदवाडी फाट्याजवळ स्वत:चे मोटरसायकलवरुन पडून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा जकुराच्या फिर्यादी नामे- संध्या आण्णासाहेब भोसले, महिला पोलीस हावलदार नेमणुक आंबी पोलीस ठाणे यांनी दि.08.07.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 (1) सह 180 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“लैंगीक अत्याचार.”
बेंबळी पोलीस ठाणे :एका गावातील 40 वर्षीय महिला (नाव- गावगोपनीय) दि.07.07.2025 रोजी 23.00 ते 23.30 वा. सु. ही घरी एकटी झोपली असताना गावातील एका तरुणाने तिचे घरी येवून तिस मारहाण करुन बळजबरीने तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.अशा मजकुराच्या पिडीतेने दि.08.07.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 333, 115(2), 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांची कारवाई.”
उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांचे पथक उमरगा उप विभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 08.07.2025 रोजी उमरगा तालुक्यात गस्तीस होते. मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव शेलार यांना गोपनीय माहिती मिळाली की, कवठा ता. उमरगा येथील लातुर जाणारे रोडलगत कवठा शिवारातील दयानंद सोनवणे यांचे शेतातील गोठ्या मध्ये काही इसम तिरट जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणच्या गोठ्यामध्ये 18.20 वा. सु. छापा टाकला असता तेथे शाम निशीकांत काळे, वय 32 वर्षे, समीर सर्फराज शेख, वय 21 वर्षे, रा. किल्लारी ता. औसा जि. लातुर, आकाश राम कदम, महेश मोहन काळे, वय 35 वर्षे, रा. माडज, किशोर बालाजी ननुरे, वय 34 वर्षे,, कैलास शेषेराव पुजारी, वय 35 वर्षे, रा. किल्लारी ता. औसा, गोपाळ पंड पंजारी, वय 45 वर्षे, रा. किल्लारी ता. औसा जि. लातुर,. हबीब दस्तगीर सय्यद, वय 40 वर्षे, रा. शिरसल ता. औसा, दत्ता पुन्नु चव्हाण, वय 44 वर्षे, रा. होळी ता. लोहारा, जितेंद्र ज्ञानोबा काळे, वय 38 वर्षे, रा. उमरगा, विवेकानंद शंकरराव सोनवणे, वय 48 वर्षे, रा. कवठा ता. उमरगा, सचिन हरिदास गायकवाड, वय 32 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. पथकाने नमूद जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 03 कार, 09 मोबाईल फोन व रोख रक्कम 13,900 असा एकुण 17,58,690 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे श्री. सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला