August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.20 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 219 कारवाया करुन 1,46,200 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सरोजा सुखदेव सुर्यवंशी, वय 42 वर्षे, रा. चिंचकोटा ता. उमरगा जि.धाराशिव हे दि.20.11.2023 रोजी 17.30 वा. सु. चिंचकोटा येथील चौकात अंदाजे 1,100 ₹ किंमतीची गावठी दारु 10 लि. अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 2) अब्दुल रशीद शेख, वय 53 वर्ष रा. येळी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.11.2023 रोजी 17.35 वा. सु. येळी गावचे जवळ लकी धाब्या जवळ अंदाजे 2,770 ₹ किंमतीच्या 17 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.20.11.2023 रोजी 14.15 वा. सु. उमरगा पो. ठा. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)व्यंकट अप्पाराव बिराजदार, वय 40 वर्षे,जकेकुर, ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.15 बस स्थानकच्या बाजूस प्रभात हॉटेलच्या पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,580 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)रणजित सुधाकर पाटील, वय 45 वर्षे, शिवपुरी कॉलनी, ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.30 आरोक्य दुध दुकानाचे जवळ उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,110₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अकबर हुजुर मुल्ला, वय 38 वर्षे, रा.तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.11.2023 रोजी 15.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 8977 ही उमरगा चौरस्तायेथे एन. एच 65 सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) महेश सिद्राम पेटे, वय 28वर्षे, रा.मुदकन्ना गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.11.2023 रोजी 20.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 डी. एल. 4557 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरुम येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)अकलाक रशीद शेख, वय 40 वर्षे, रा. ढोकी, ता. जि. धाराशिव यांनी दि.20.11.2023 रोजी 13.45 वा. सु.आपल्या ताब्यातील ॲपे क्र एमएच 24 एल 9849 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. तसेच 2)अरुण चंद्रहास गाडे, वय 56 वर्षे, रा. गंभीरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.20.11.2023 रोजी 19.00 वा. सु.आपल्या ताब्यातील चारचाकी क्र एमएच 25 पी. 6766 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)शिवराम नागनाथ चव्हाण, वय 31 वर्षे, रा. नळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.20.11.2023 रोजी 16.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे क्र एमएच 25 एम 973 हा येणेगुर बस स्थानक जवळ एनएच 65 रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
  • तामलवाडी पोलीस ठाणे : जवाहर नगर हिरा मोती टावर विडी घरकुल हैद्राबाद रोड सोलापूर येथील- नरेंद्र सत्यनारायण कोंडा, वय 43 वर्षे यांनी दि. 20.11.2023 रोजी 17.20 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुजर क्रं. एम.एच.13 ए.सी. 0817 ही सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच 52 रोडवर वडगाव काटी जाणारे रस्त्याजवळ तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- राजेंद्र नरसप्पा कवडे, वय 60 वर्षे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांचे राहाते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 19.11.2023 रोजी 22.00 ते दि. 20.11.2023 रोजी 04.00 वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 1,00,000₹ असा एकुण 4,41,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजेंद्र कवडे यांनी दि.20.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सविता विजय जाधव, वय 40 वर्षे, रा. रुद्रवाडी ता. लोहारा जि. धाराशिव ह.मु. विजयापूर रोड सोलापूर यांचे दि.20.11.2023 रोजी 14.30 ते दोन महिन्या पुर्वी जळकोटवाडी शिवारातील शेत गट नं 318 मधील पाण्याचे बोअरमधील 6 एच. पी. मोटर, 40 पीव्हीसी पाईप, वायर 400 मीटर व र्स्टाटर असा एकुण 60,000₹ किंमतीचा माल हा आरोपी नामे- भिमाशंकर कुंभार रा. जळकोट ता. तुळजापूर हा. मु. नानापेठ पुणे यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सविता जाधव यांनी दि.20.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-दिपक रामचंद्र पाटील, सोबत मयत नामे- कविता संजय गायकवाड, वय 42 वर्षे, शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर ता. जि. सोलापूर हे दोघे दि 17.11.2023 रोजी दुपारी 04.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 ई. बी. 8380 वरुन लातुर तुळजापूर बायपास रोडवरुन सिंदफळ फाटा पांढरे वस्ती येथुन जात होते. दरम्यान दिपक पाटील यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन स्पीड ब्रेकरवर ब्रेक मारल्याने मोटरसायकल खाली पडून आपघात झाला. या आपघातात कविता गायकवाड या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी संजय जयकुमार बुरसे, वय 52 वर्षे, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर ता. जि. सोलापूर यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!