June 25, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23 जुन रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 285 कारवाया करुन 2,60,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • मा.पोलीस अधीक्षक श्रीमती.रितु खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.23.06.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले सुमारे 70 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 225 लिटर गावठी,300 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी विदेशी दारुच्या 60 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,18,950 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)उमरगा पो ठाणेच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-धोंडुसिंग भ्वानसिंग परिहार, वय 44 वर्षे, रा.यडोळा ता. तुळजापूर ह.मु. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु.माडज जाणारे रोडलगत शेतातील पत्र्याचे शेडचे बाजूला अंदाजे 1,130 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-आदिनाथ देवराव चव्हाण, वय 49 वर्षे, रा.सेवा नगर बंजारा वसात मेंन्टल हॉस्पीटल वांगळे इस्टेट ह.मु. हॉटेल बंजारा शेजारी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.30 वा. सु.हॉटेल विश्वा बार शेजारी असलेले अमता किराणा स्टोअर्स समोर उमरगा येथे अंदाजे 9,000 किंमतीची 90 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-अनिल प्रभु मरगंमाकोळी, वय 22 वर्षे, रा.एकोंडी जाहागिर ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.20 वा. सु.उमरगा ते एकुंडी जहागीर जाणारे रोडवर शिंदे यांचे शेतासमोर उमरगा येथे अंदाजे 8,300 किंमतीची 100 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे- निगय्या नागय्या गुत्तेदार, वय 36 वर्षे, रा. चिंचपुर ता. अळंद जि. कलबुर्गी ह.मु. तलमोड ता.उमरगा जि. धाराशिव हे 20.15 वा. सु.तलमोड ते आरटीओ टोल नाक्याकडे जाणारे तलमोड शिवारातील असलेले मुकींद मोरे यांचे शेतासमोरील असलेल्या ओढ्या शेजारी अंदाजे 16,300 किंमतीची 200 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-अनिल नागनाथ पवार, वय 34 वर्षे, रा.तुरोरी ता.उमरगा जि. धाराशिव हे 18.10 वा. सु.आपल्या पत्र्याचे शेडसमोर तुरोरी येथे अंदाजे 5,500 किंमतीची 55 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 2)लोहारा ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-कमलाकर रामचंद्र चव्हाण, वय 55 वर्षे, रा.होळी ता. लोहारा जि. धाराशिव हे 07.40 वा. सु. सास्तुर येथे आपल्या शेतात अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे 300 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.आरोपी नामे-सुरेश रुपचंद चव्हाण, वय 52 वर्षे, रा.होळी तांडा ता. लोहारा जि. धाराशिव हे 06.45 वा. सु. होळी शिवारात त्यांचे शेताचे दक्षिणेस बांधाचे लवनात अंदाजे 40,000 ₹ किंमतीचे 400 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-संतोष सुभाष दंडगुले, वय 34 वर्षे, रा.जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव हे 14.45 वा. सु. आपल्या राहत्या घरसमोर मोकळ्या जागेत अंदाजे 880 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 3)बेंबळी ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-अनिल नाना पवार,वय 34 वर्षे, रा.मेडसिंगा ता. जि. धाराशिव हे 16.00 वा. सु.मेडिंसगा शिवार येथे अंदाजे 2,200₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 4)ढोकी ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-रमेश बबु पवार, वय 52 वर्षे, रा. पारधीपिढी तेर ता.जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. बसस्थानक तेरच्या मागील बाजूस पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 4,800₹ किंमतीची 60 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 5)नळदुर्ग ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राजेंद्र राम गुड्डे, वय 68 वर्षे, रा.नांदगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 14.15 वा. सु. नांदगाव ते जळकोट जाणारे रोडच्या कडेला पत्राचे शेडसमोर अंदाजे 840₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.23.06.2025 रोजी 13.15 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत भुम बसस्थानकचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुनिता महादेव काळे, वय 29 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता.भुम जि. धाराशिव या 13.15 वा. सु. बसस्थानक भुमचे पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 710 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.23.06.2025 रोजी 18.00 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत हॉटेल प्रेस्टीज समोरील तुळजाभवानी कॉम्पलेक्स मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जमीर हबीब तांबोळी, वय 39 वर्षे, रा.आगडगल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. हॉटेल प्रेस्टीज समोरील तुळजाभवानी कॉम्पलेक्स मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-मुल्ला व्यंकटा नरसिमा रेड्डी, वय 35 वर्षे, रा.रामारेड्डी अकावेडी प्रकाशराम आंध्रप्रदेश हे दि.22.06.2025 रोजी 22.58 वा. सु.आपल्या ताब्यातील बलेनो कार क्र एमएच 12 आर.के.6874 ही जकेकुर गावाच्या जवळ सोलापुर हैद्राबाद जाणारे रोडवर उत्तर बाजूस हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-सचिन प्रविण धारुरकर, वय 29 वर्षे, रा. तिरुपती कॉलनी भवानी चौक सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.22.06.2025 रोजी 22.30 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 जे 6648 ही पोलीस ठाणे आनंदनगरच्या परिसरात हायगयी व निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करुन चालवून मो.वा.का. कलम-185, 85(1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-उषा अशोक खटावकर, वय 55 वर्षे, रा.ईट ता. भुम जि. धाराशिव यांनी तेरखेडा येथुन आरोपी नामे- तानाजी बाबुशा काळे, वय 30 वर्षे, रा. लक्ष्मी पारधीपिढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव याचे मोटरसायकलवर लिफ्ट मागून सरमकुंडी फाट्याकडे येत असताना नमुद आरोपींने दि.23.06.2025 रोजी 11.00 वा. सु. धुळे सोलापुर हायवे रोडचे बाजूस घुले माळ वाशी शिवार येथे नैसर्गिक विधी करण्यासाठी थांबून परत गाडीकडे येवून उषा खटावकर यांचे गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व मंगळसुत्र हिसकावुन घेवून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुजन दास यांनी दि.22.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 304(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.नमुद गुन्ह्याच्या तपासा दरम्यान वाशी पोलीसांनी आरोपी नामे-तानाजी बाबुशा काळे, वय 30 वर्षे, रा. लक्ष्मी पारधीपिडी तेरखेडा ता. वाशी यास ताब्यात घेवून त्यास नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडून गुन्ह्यातील माल जप्त केला. गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
  • “आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:मयत नामे-बाळु तुकाराम पंडीत, वय 25 वर्षे, रा.लिटलस्टार शाळेजवळ बॅक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 17.06.2025 रोजी 22.00 वा. सु.जहागिरदारवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यात रेल्वे रुळावर उडी घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- इर्शाद इसाक सय्यद, रा. पोलीस लाईन धाराशिव, नसरीन फिरोज मजकुरे, रा. मिली कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी मयत बाळु यास आमच्या सोबत लग्न कर नाहीतर तुझी बदनामी करु अशी धमकी दिल्याने त्या दोघांचे त्रासाला कंटाळुन बाळु यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई राधा भ्र तुकाराम पंडीत, वय 50 वर्षे, रा. भोपाल नगर लिटलस्टार शाळेजवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.23.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 351(2),(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-स्वप्नील सिद्राम रगबले,सुमित रगबले, खंडु उर्फ विजयकुमार तम्मा नामणे तिन्ही रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.02.02.2025 रोजी 10.00 वा. सु.वडगाव देव येथील मारुती मंदीराजवळ फिर्यादी नामे-अशोक धुळाप्पा वाघामारे, वय 65 वर्षे, रा.वडगाव देव ता.तुळजापूर जि. धाराशिव यांना व इतर 55 शेतकरी यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन सोयाबीनला इतर ठिकाणी कमी भाव आहे व आमच्याकडे ओरंगाबाद, पुणे येथील सोयाबीन खरेदी कंपनीशी डायरेक्ट संपर्क आहे त्यामुळे आम्ही सोयाबीनला 4,700₹ चा भाव देवू असे आमीष दाखवून सोयाबीनची 60 रक्क आता देतो व 40 टक्के रक्कम एक महिन्याने देतो असे सांगून फिर्यादी यांनी विश्वास ठेवून सोयाबीन त्यांना विक्री केले. नमुद आरोपींनी उर्वरीत 40 टक्के देण्याचे टाळाटाळा करुन उर्वरित रक्कम 1,02,09,703 ही न देता फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक वाघमारे यांनी दि.23.06.2025रोजी दिलेल्या प्रथक खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “लैंगीक अत्याचार.”
  • ढोकी पोलीस ठाणे :एका गावातील 13 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) 29.04.2025 ते दि.16.06.2025 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. हिस गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. दि.16.06.2025 रोजी गावातील दुसऱ्या दोन तरूणांनी तिस बुलेटवर बसवून शेजारच्या गावातील रोडलगत असलेल्या पत्र्याचे शेडवर नेहुन दोघांनीही तिचेवर लैंगीक अत्याचार केला.घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला व तुझे वडील व चुलते यांना जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.23.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 64(2), (एम), (आय), 65(1),70(1), 351 (2),(3),3(5) सह पोक्सो कलम 4,5(जी),(एल),6, 8 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • परंडा पोलीस ठाणे: आरोपी नामे- हरीभाउ भिमराव रामगुडे रा. चिखर्डे, ता. बार्शी जि. सोलापूर यांचा छोटा हत्ती क्र एमएच25 ए.जे.4348 मध्ये प्रवास करणारे फिर्यादी नामे- हनुमंत मधुकर तुपेरे, वय 60 वर्षे, शाम भाउ लांडगे, सुरेखा तुपेरे, अनिता नंन्नवरे, निलम तुपेरे, पल्लवी माळाळे, भगवान तुपेरे, विद्या लंकेश्वर, संगीता तुपेरे व मयत नामे-हावई देवीदास तुपेरे, वय 65 वर्षे, सर्व रा. चिखर्डे, ता. बार्शी जि. सोलापूर हे दि.23.06.2025 रोजी सकाळी 08.00 वा. सु.छोटा हत्ती क्र एमएच 25 एजे4348 मधून जात होते. दरम्यान बार्शी ते भुम रोडवर देवंग्रा शिवारात आरोपी नामे- हरीभाउ रामगुडे यांनी त्याचे ताब्यातील छोटा हत्ती हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडचे खाली जावुन पल्टी होवुन अपघात झाला. या अपघातात हावई तुपेरे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. तर हरीभाउ भिमराव रामगुडे रा. चिखर्डे, ता. बार्शी जि. सोलापूर यांचा छोटा हत्ती क्र एमएच25 ए.जे.4348 मध्ये प्रवास करणारे फिर्यादी नामे- हनुमंत मधुकर तुपेरे, वय 60 वर्षे, शाम भाउ लांडगे, सुरेखा तुपेरे, अनिता नंन्नवरे, निलम तुपेरे, पल्लवी माळाळे, भगवान तुपेरे, विद्या लंकेश्वर, संगीता तुपेरे हे सर्व जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत तुपेरे यांनी दि.23.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या. सं. कलम 281, 106 125(अ),125(बी) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे-अल्लाउद्दीन दस्तगीर शेख, वय 50 वर्षे, रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.06.06.2025 रोजी 20.30 वा. सु.घराकडे पायी जात होते. दरम्यान बार्शी ते तुळजापूर रोडवर मोटरसायकल क्र एमएच 13 ई.बी. 9474 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अल्लाउद्दीन शेख यांना पाइीमागून धडक दिली. या अपघातात अल्लाउद्दीन शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद मोटरसायकल चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जात वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहसीन अल्लाउद्दीन शेख, वय 31 वर्षे, रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.23.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या. सं. कलम 281, 106,125(ए),125(बी) सह कलम 134 (अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!