June 21, 2025

बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे

  • कळंब – समाजाला वैचारिक जागृत करण्याचे काम शिक्षकाशिवाय इतर कोणीही करू शकत नाही असा ठाम विश्वास ओबीसी संघर्ष युद्धे ऍड.मंगेश ससाणे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये सन्माननीय मंगेश जी ससाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
    राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाची दुसरी राज्यस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. समस्त ओबीसी बहुजन वर्गाला जागृत करून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने ओबीसी संघर्ष योद्धे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे, उपोषण कर्ते,अभ्यासु वकील मंगेश ससाणे यांनी ओबीसी समाजातील विध्यार्थ्यांसाठी स्थापित केलेली महाजोती या संस्थेबाबत माहिती देऊन महाज्योतीच्या विविध योजना, शासनाकडून सुरू असलेल्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना ओबीसी महामंडळ योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ओबीसी समाजातील सुशिक्षित वर्गात जाणीव जागृती झाल्याशिवाय आपल्या हक्काचे संरक्षण होणार नाही हे स्पष्ट आहे. गेल्या दोन अडीच वर्षांत राज्यातील समाजमन ढवळून निघाले असुन अनेक कठीण प्रसंगातून ओबीसी जात आहे.यासाठी आपण एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. समाजावर होणारे अन्याय अत्याचार उघडकीला आणुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील असे आवाहन त्यांनी यावेळी केले.राज्यातील रोस्टर घोटाळा हा एक गंभीर प्रश्न असून अनेक प्रकरणात असे निदर्शनास आले आहे की, सर्वसाधारण प्रवर्गातुन नोकरी मिळालेली असताना सुद्धा नंतर च्या कालावधीत संबंधितांचे जात प्रमाणपत्र मागवुन घेत त्याचा जातीचा जो प्रवर्ग आहे.त्या राखीव प्रवर्गात त्याचा समावेश केला असल्याचे बहुतांश जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी निदर्शनास आणून दिले. नाशिक जिल्ह्यात पेसा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे नाशिक येथील पदाधिकारी बांधवांनी सांगितले. ओबीसी प्रवर्गातील मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती विनाअट सर्वाना द्यावी, टाळाटाळ व हयगय करणाऱ्यांना दोषी धरावे याबाबतही चर्चा करण्यात आली.पदोन्नतीत ओबीसी बांधवाना संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे याबाबत चर्चा करून ठराव घेण्यात आला. या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिवाळी सुट्टीत संघटनेचे राज्य स्तरीय अधिवेशन शिर्डी अथवा अलिबाग येथे घेऊन त्या अधिवेशनात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, बहुजन कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री याना निमंत्रित करून त्यांना या सर्व बहुजन समाजाच्या समस्या लक्षात आणून देऊ आपण मोठ्या संख्येने या अधिवेशनात सामील व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांनी केले. ओबीसी योद्धे छगनराव भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.नाशिक हुन बबनराव चव्हाण,प्रशांत शेवाळे व राजेंद्र खैरनार यांनी लवकरच सत्कार सोहळ्याचे नियोजन करू असे सांगितले. राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ हा राज्यातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असताना जास्तीत जास्त संख्येने आजीवन सभासद बनवून संघटनेची ताकद महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी बहुजन शिक्षक या व्यासपीठावर यावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना सर्व जिल्हा पदाधिकारी यांना केली. समाजातील सर्व ओबीसी./ एन. टी./व्ही.जे. /एन. टी./ एस. बी. सी. या सर्व विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळते पण याबाबत जागरूकता नसल्याने ओबीसी विध्यार्थी या योजनांपासून कोसोदूर राहतात.त्यामुळे आपण जबाबदार घटक या नात्याने आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील शाळेतील सर्व विद्यार्थी यांचे प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा ही करावा असे आवाहन केले.
    या सभेला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले,सरचिटणीस संतोष भोजने,उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,कार्याध्यक्ष बबनराव चव्हाण,महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई सुडे,प्रसिद्धी प्रमुख सचिन गडपतवार,राज्य कोषाध्यक्ष संजय भोईर,राज्य प्रतिनिधी राजेंद्र खैरनार, हिंगोली जिल्हाध्यक्ष लहू राक्षे, लातूर जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर,खाजगी विभाग प्रमुख राजन पाटील,मनपा प्रमुख श्रीराम पळसकर, कोकण विभाग प्रमुख गोरख आघाव, मराठवाडा विभाग प्रमुख संजय मळभागे, भालचंद्र खाडे, राजेंद्र सरक, आप्पाराव शिंदे, अरुण भूकन, खंडेराव सानप, पुरुषोत्तम म्हेत्रे, भाऊसाहेब जाधव, सदाशिव भाले, काशिनाथ घाणेकर, दशरथ शिंगारे, धनंजय सरक, आप्पा खैरनार, संतोष केंद्रे,रविभाऊ गुट्टे,उमाकांत डिगे, श्रीकांत धनवट, राम जोरवर ,सचिन गणपतवार, चंद्रकांत चौरे, ज्ञानेश्वर महाजन, विनायक केंद्रे, आनंदा गांगुर्डे, ज्ञानेश्वर महाजन, भास्कर म्हात्रे, सुनील शेलार, शंकरराव मुरकुटे, नूरखा पठाण, विजय महाजन, संतोष सगर, एमडी काळे, विष्णू काळे, सुभाष पांचाळ, नामा पवार, सुधाकर अटके, सुदर्शन गिराम, सिंधू शेळके, संजय भोईर, बालाजी चेटमपल्ले, संतोष भोजने, कुंडलिक चौधरी, संकेत पांचाळ, श्रीकांत मददे, सुधाकर अटके, सोनिया जमदाडे, मंगेश सुवर्णकार, सुधाकर अटके, प्रज्वल मोहटे, जितेंद्र कुमार मानकर, रमेश खाडे, नानासाहेब गोरणे, लक्ष्मण दावणकर, परमेश्वर गलांडे, अंगद सोगे, अजित जाधव, सुभाष सानप, धनाजी घरत, प्रशांत शेवाळे, राहुल म्हेत्रे, रामदास वडीमिले, अर्जुन जाधव, मिलिंद दुधाळ, सचिन रासवे, विनया जाधव, रामराव मुरकुटे,संतोष चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!