कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे प्रवेशोत्सवाच्या वेळी धाराशिव जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे यांनी वरील मत व्यक्त केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लांडगे यांनी सांगितले की,खरे शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळते आणि मातृभाषेतून शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतूनच दिले जाते.इंग्रजी माध्यमांच्या शाळा या केवळ देखाव्यापुरत्या असुन खरी गुणवत्ता ही गावातल्या जिल्हा परिषद शाळेतच आहे.जिल्हा परिषद शाळेतील सर्व स्टाफ हा उच्चविभूषित असून गुणवत्तेचे व ज्ञानदानाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहे. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा शाळेची जडणघडण येथील गुरुजनांमुळे आणि पालकांच्या सहकार्यातूनच झालेली आहे याबद्दलही लांडगे यांनी गौरवोद्गार काढले.शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा व सोयी यांचा आढावा यावेळी मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी उपस्थितांना करून दिला.मध्यान्ह भोजन योजनेसह विविध शिष्यवृत्ती व लाभाच्या योजनेची माहिती दिली.शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शाळेत प्रवेश घ्यावा तसेच पालकांनीही आपल्या मुलींची मुले (नातवांचे) प्रवेश आपल्या या शाळेत घ्यावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बूट सॉक्स, गणवेश व पाठ्यपुस्तके यांचे वाटप यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच शरद गालट यांनीही शाळेतील शिक्षक वृंद व गुणवत्ता याबद्दल कौतुक करत शाळा आणि शिक्षकांच्या पाठीशी शालेय समिती व ग्रामस्थ ठामपणे उभे असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जरीचंद लोमटे,संतोष कोळी,अशोक कराड, श्रीमंत माने प्रमोद रसाळ रमेश लोमटे, रत्नदीप लोमटे, बिभीशन गोडसे, लक्ष्मण टकले यांच्यासह शाळेतील सहशिक्षक श्री मकरंद नाडे, श्रीमती भारती सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन शरद गालट यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी