कळंब – गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले साप्ताहिक साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके यांची कार्यनिष्ठता व पत्रकारितेबद्दलची एकनिष्ठता लक्षात घेऊन ऑल इंडिया संपादक संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करणजी बौद्ध यांनी संपादक सुभाष घोडके यांना धाराशिव जिल्हा अध्यक्षपदाचा कारभार सोपवला आहे. संपादक सुभाष घोडके यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच आपल्या सहकारी बांधवांशी चर्चा करताना संपादक सुभाष घोडके यांनी आपण ऑल इंडिया संपादक संघ या संस्थेची एकनिष्ठ राहून संस्थेचे नाव पुढे नेऊ तसेच ऑल इंडिया संपादक संघ या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब तसेच भटक्या विमुक्त जनतेचा आवाज उठवू व न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी नेहमी तत्पर राहू असे आश्वासन दिले. तसेच ऑल इंडिया संपादक संघाने व ऑल इंडिया संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष करण बौद्धजी यांनी धाराशिव जिल्ह्याची जी जबाबदारी सोपवली व जो विश्वास दाखवला त्यावर इमानदारी व तत्परतेने काम करेल असेही संपादक सुभाष घोडके यांनी वचन दिले व संघटनेचे तसेच सर्व शुभचिंतकाचे आभार मानले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी