कळंब – प्रति वर्षाप्रमाणे कळंब तालुका पतंजली योग समितीच्या वतीने प्रसिद्ध योगशिक्षक कळंब भूषण शशीकुमार भातलवंडे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त दिनांक १७ जून ते २१ जून पहाटे ५ ते ७.३० या वेळेत योग प्राणायाम शिबिराचे पुनर्वसन सावरगाव हनुमान मंदिर कळंब येथे आयोजन करण्यात आले आहे,शिबिराचे उद्घाटन डॉ. आकांक्षा पाटील यांच्या हस्ते तर समारोप नॅचरल शुगरचे चेअरमन कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. गेली वीस वर्ष पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी कळंब भूषण शशिकुमार भातलवंडे हे नित्य प्राणायाम व योग अभ्यासाचे वर्ग घेत आहेत त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय कार्यालयासाठी आयोजित शिबिरातून योग अभ्यास व प्राणायाम वर्ग घेतले आहेत शशिकुमार भातलवंडे आरोग्यासाठी योग प्राणायम महत्त्व सांगतात मोठ्या प्रमाणावर बी.पी.शुगरचे प्रमाण वाढत असून ताण, तणाव कमी करण्यासाठी योग,प्राणायाम काळाची महत्त्वपूर्ण गरज आहे यामुळे होणारे आजार बरे होतात तसेच भातलवंडे आपल्या शिबिरातून मार्गदर्शना बरोबरच व्यसनमुक्तीची शपथ देतात याचा परिणाम हजारो लोकांनी व्यसन सोडले आहे.या शिबीरात मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रताप हुंडेकरी पतंजली योग समिती कळंब तालुका प्रभारी यांनी केले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड