June 20, 2025

पोलिस मायंदे यांचा सहपत्निक ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार व निरोप

  • कळंब – कळंब पोलीस स्टेशन येथे गेली सहा वर्ष सेवेत असलेले पोलीस नाईक श्रीराम कालिदास मायंदे यांची जिल्हा विशेष शाखा धाराशिव येथे व त्यांच्या पत्नी महिला पोलीस नाईक राजश्री बाबुराव जावळे – मायंदे ( पती-पत्नी ) यांची आनंदनगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे बदली झाली असून त्यांनी गेली सहा वर्ष कळंब पोलीस स्टेशन येथे केलेल्या उत्कृष्ट सेवेतुन जनसामान्यात आपुलकी आदराचे स्थान मिळवले आहे. त्यांनी वृक्षारोपण तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री , पोलीस विभागाचे अधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला आहे. कामकाजातील अडचणी तसेच केलेल्या कामाची कसलीही तक्रार राहणार नाही याची ते दक्षता घेतात.हा सत्कार कार्यक्रम कळंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडे यांच्या उपस्थितीमध्ये कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मायंदे पती-पत्नींचा फेटा,शाल, पुष्पहार देऊन,सत्कार करण्यात आला व याप्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी,यश, उत्तम आरोग्य,मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महादेव महाराज अडसूळ,प्रकाश भडंगे,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवसिंग राजपूत,बंडू ताटे, भाजपाचे सतपाल बनसोडे, निशिकांत गायकवाड,सचिन क्षिरसागर,पोलीस कर्मचारी गोविंद मोटेगावकर,बालाजी मोरपल्ले,भारत गायकवाड, औदुंबर गजभार यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!