कळंब – दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेमध्ये औरंगाबाद विभागातून रु.१०० कोटीपर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांमधून सन २०२३ – २०२४ सालासाठी पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि.कळंब बँकेची निवड करण्यांत आलेली आहे. याविषयीचे पत्र दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनने प्रियदर्शनी अर्बन बँकेचे चेअरमन प्रा.श्रीधर भवर यांना पाठविले असून त्यांनी या पत्रात चेअरमन, संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश संपादन केले आहे.याबद्दल सहकार चळवळी तर्फे अभिनंदन केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी