June 20, 2025

देवळाली येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन

  • देवळाली – देवळाली ग्रामपंचायतच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा उद्घाटन सोहळा दि.१२ मे २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या हस्ते पार पडला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर,सरपंच अविनाश माळी,उपसरपंच अजितसिंह पाटील,ग्रामसेवक अशोक निपाणीकर,पोलीस पाटील संदीप देशमुख,ग्रा.प. सदस्य रावसाहेब पाटील,सुरज माने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एक सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे एक पोलीस कर्मचारी असल्याचे म्हटले आहे.व गावात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे देवळाली गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत मिळेल. शिराढोण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इतर ग्रामपंचायतच्या सरपंचांनी देवळाली ग्रामपंचायतचे अनुकरण करून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा असे आवाहन संजय पवार यांनी केले.त्याचबरोबर देवळाली गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल सरपंच अविनाश माळी यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील संदीप देशमुख यांनी केले.
error: Content is protected !!