June 19, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) जिल्हा कार्यालय (उस्मानाबाद) धाराशिव येथे दि.01 मे 2025 रोजी 65 वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला.
    65 वा महाराष्ट्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गायले जाऊन भारत माता की जय चा जयघोष व देशभक्तीपर नारे देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 65 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गौरव यात्रा आयोजित करण्यात आली.हि यात्रा धाराशिव जिल्ह्यात आली असता 29 एप्रिल व 30 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
    यावेळी उपस्थित प्रदेश संघटक सचिव खलील पठाण,जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,महीला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल,सा.न्याय.सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे,धाराशिव शहर महिला अध्यक्ष सुलोचना जाधव, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ओबीसी सेल जिल्हा सचिव नारायण तुरूप, रवींद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी विभाग,सौरभ देशमुख,ओंकार राठोड आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!