ईटकुर – कळंब मधील यशाची परंपरा याही वर्षी कायम आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2025 या परीक्षेत ईटकुर बीट मधील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी परीक्षेतील पात्र विद्यार्थी संख्या सलग दुसऱ्या वर्षी 100 वर गेली आहे.मागील वर्षी 103 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होते तर यावर्षी 114 विद्यार्थी पात्र झालेले आहेत.या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे बीट मधील तब्बल 18 शाळांमध्ये विद्यार्थी पात्र ठरले आहेत.यामध्ये सर्व प्रकारच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात. गुणवत्तेचे विकेंद्रीकरण केले जात आहे.परिणामी सर्व शाळेमधील विद्यार्थी संख्या पटसंख्या निश्चित होत आहे.सर्व जि.प शाळांमधील द्विशिक्षकी आणि बहुशिक्षकी शाळेतील विद्यार्थी पात्र ठरत आहेत.या निकालामध्ये द्विशिक्षिकी शाळेमधलाही एक विद्यार्थी पात्र ठरलेला आहे. हे या वेळच्या निकालाचे वैशिष्ट्य ठरत आहे.यावर्षी विशेष उपक्रमात परीक्षा एक मार्गदर्शक अनेक या राज्यस्तरावर निवडला गेलेल्या ऑनलाइन तासिकेने अनेक तज्ञ शिक्षकांचे विद्यार्थी व शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले त्याचा फायदा या परीक्षेत दिसून येत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हे यश लक्षणीय असून ग्रामीण भाग गुणवत्तेत कुठेच कमी नाही.हे या निकालावरून स्पष्ट होते. गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 18 शाळा खालील प्रमाणे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी संख्या केंद्र ईटकुर १) जि.प.प्रशाला ईटकुर -२० २) जि.प.प्राथमीक शाळा खोंदला – ५ ३) जि.प. प्राथमीक शाळा पाथर्डी २ ४)जि प प्राथमीक शाळा भोगजी २ ५ )जि प प्राथमीक शाळा बोरगाव ध २ ६) जि प प्राथमीक शाळा गंभीरवाडी २ ७ )जि प प्राथमीक शाळा आथर्डी १ ८)जि प प्राथमीक शाळा आढाळा १ एकुण ३५ इयत्ता आठवी केंद्र ईटकुर १ )जि प प्रशाला ईटकुर ६ २ ) तानाजी मालुसरे मा विद्यालय ईटकुर १ एकुण ७ अंदोरा केंद्रातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी संख्या १ ) केंद्रीय प्राथमिक शाळा आंदोरा ११ २)जि प प्राथमीक शाळा कन्हेरवाडी १० ३)जि प प्राथमीक शाळा हसेगाव केज ७ ४)जि प प्राथमीक शाळा वाकडी केज ६ ५)जि प प्राथमीक शाळा हावरगाव ६ ६)जि प प्रशाला मस्सा खंडेश्वरी ५ ७)जि प प्राथमीक शाळा तांदुळवाडी १ ८)कॅनव्हास इंग्लिश स्कूल २५ एकुण ७१ इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी संख्या १ )पद्मश्री शंकर बापू माध्यमिक विद्यालय हासेगाव केज १ एकूण १ ईटकुर केंद्र जि.प.शाळा पाचवी ३५ + जिप प्रशाला आठवी ६ + तानाजी मालुसरे मा विद्यालय १ एकुण ४२ अंदोरा केंद्र जि प शाळा पाचवी ४६ + कॅनव्हास इंग्लिश स्कूल २५+इयत्ता आठवी पद्मश्री शंकर बापू मा विद्यालय १ एकुण ७२ याप्रमाणे ईटकुर केंद्र एकूण 42 आंदोरा केंद्र एकूण 72 असे एकूण 114 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे