कळंब (सतीश घोडेराव) – महाराष्ट्र शासनाने आर्थिक दृष्टया
कमकुवत लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध आर्थिक विकास
महामंडळाची निर्मीती केलेली आहे. या माध्यमातुन सुशिक्षीत बेरोजगार व उद्योजक यांना
कर्ज पुरवठा केला जातो. कर्जदार हे ग्रामीण भागातील असुन वारंवार पडणारे दुष्काळ
तसेच नापीकी या मुळे व्यवसायावर परिणाम होतो व आर्थीक नुकसानीमुळे कर्ज परतफेड
करता येत नाही. त्याची थकीत बाकी बनते सदर कर्जाचा डोंगर वाढत जातो कर्ज परतफेड
करता येत नाही. शासनाने याचा विचार करून कर्ज माफी दयावी. असे निवेदन धाराशिव जिल्हा बहुजन जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना घेण्यात आली आहे या निवेदनात यापुर्वी २००८ मध्ये
शासनाने कर्ज माफी दिली होती २००८ नंतर १७ वर्षे झाली कर्ज थकीत आहेत वाटपाची
परतफेड करता येत नाही.
सर्व परिस्थितीचा विचार करून सर्व आर्थीक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे
अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनावर बहुजन जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे , जिल्हा उपाध्यक्ष सुनील गायकवाड,कळंब तालुकाध्यक्ष
वैजीनाथ डोंगरे, कळंब तालुका उपाध्यक्ष आश्रुबा शिंदे यांच्या सह्या आहेत.
More Stories
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
जनगणना २०२७ ची तयारी ३७३१ कर्मचारी सज्ज
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल