कळंब (महेश फाटक ) – महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले जनसुरक्षा विधेयक संपूर्णपणे लोकशाही विरोधी आहे.संविधान विरोधी तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.जन सुरक्षा विधेयक-२०२५ चा जाहीर निषेध व हे विधेयक तात्काळ रद्द करावे म्हणून डाव्या विचार श्रेणीच्या आणि पुरोगामित्व जोपासणाऱ्या विविध संघटना व संस्थांच्या वतीने जन सुरक्षा विधेयक २०२५ विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार दिनांक २२ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या मार्फत देण्यात आले. याप्रसंगी स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुसद्देक काझी,भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सी.आर.घाडगे, मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड,स्वराज इंडियाचे शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत,काँग्रेस आय पक्षाच्या धाराशिव जिल्हा महिला अध्यक्षा ज्योतीताई सपाटे,भारत छोडो अभियानचे तालुका समन्वयक बंडू ताटे,बलभीम बोंदर, सामाजिक कार्यकर्ते आश्रुबा गाडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जन सुरक्षा विधेयक २०२५ विरोधी कृती समितीच्या वतीने लोकशाही,सनदशीर,शांततेच्या आणि अंहिसेवर विश्वास असणाऱ्या संघटना – संस्थाच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गधा आणणाऱ्या जन सुरक्षा विधेयक-२०२५ ला विरोध दर्शवावा असे आवाहन स्वराज इंडिया तथा भारत जोडो अभियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी