July 31, 2026

अनंत घोगरे यांना पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

  • कळंब – धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य करणारे पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष अनंत घोगरे गोविंदपूर यांना पोलीस फ्रेंड्स असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त शुरा आम्ही वंदिले. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे व पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्काराने दिनांक रविवार 13 एप्रिल रोजी रामकृष्ण मोरे सांस्कृतिक सभागृह पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सैन्यदल व पोलीस दलातील वीर जवान, वीरपत्नी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल अनंत घोगरे यांचे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अच्युतराव माने, eps-95 सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ आंधळे यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!