कळंब – मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात शिक्षणाचा अभाव जाणवत असताना, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी आपल्या दूरदृष्टीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवा अध्याय सुरू केला.त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार हाच मुख्य उद्देश मानला. त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणून,ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साधने निर्माण झाली.मुला-मुलींसाठी शाळा,महाविद्यालये,वसतीगृहे, आणि विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन शक्य आहे,या विचारांवर त्यांनी विश्वास ठेवून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले. आदरणीय मोहेकर गुरुजींनी केवळ शिक्षण संस्था स्थापन केल्या नाहीत,तर त्या संस्था मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थी केंद्रित कशा असाव्यात,याचं जणू एक आदर्श मॉडेल तयार केलं.आजही त्यांच्या संस्थांमधून शिकलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात आपलं यशस्वी स्थान निर्माण करत आहेत. त्यांच्या कार्यामुळे शिक्षण ही केवळ शहरी मुलांची मक्तेदारी न राहता,ग्रामीण भागातील सामान्य मुलांचंही हक्काचं साधन बनलं. त्यांच्या दूरदृष्टीचा प्रकाश अजूनही हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात उजाळा देतो आहे.
ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील विविध ठिकाणी दि.१७ एप्रिल २०२५ वार गुरुवार रोजी कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर,प्रा.राहुल भिसे , धनंजय परजणे,संजय आडणे , शैलेश गुरव,बालाजी काळे आदिंची उपस्थिती होती.
कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात डॉ.ईश्वर राठोड यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,उपसंपादक अरविंद शिंदे, डॉ.दत्ता साकोळे,कार्यालयीन अधिक्षक हनुमंत जाधव व सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर,कळंब येथे मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतचा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षिका श्रीमती लोहियाबाई कावळे, सहाय्यक शिक्षक गोविंदराज कल्याणकर,मच्छिंद्र बारकुल,अंगद मिटकरी,सविता लाखे, विश्वास मोरे,विजयानंद तांबारे, बालाजी वाघमारे,सुरेखा गव्हाणे, दयानंद बन,सुवर्णा सगरे,श्रीमती वाघमारे,श्रीमती सुरज तोटेवाड, श्रीमती सुनिता सुतार,महेंद्र जगताप,किरण मुंडे,दत्तात्रय वळेकर आदींची उपस्थिती होती.
कळंब तालुक्यातील पारा येथील जय भवानी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर आण्णांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षक संदिप भराटे,सितल मेटे,सतिश वाघमारे,दिपक मुरकुटे,विकास माळी,दिपक मुळे,अमोल बांगर, शहाजी सोलंनकर,अमोल गवळी आदींची उपस्थिती होती.
विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील कार्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,सहाय्यक शिक्षक सतीश कानगुडे,शहाजी माने,शरद टोम्पे,संदीप पाटील, पवार विशाल,पवार सोपान,संतोष नागटिळक आदींची उपस्थिती होती.
भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे