कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट शाळेत दि.१४ एप्रिल २०२५ रोजी विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञासुर्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. “विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते,तर शिक्षणाचे खरे मूल्य ओळखणारे,वंचित समाजासाठी प्रकाशवाट निर्माण करणारे युगपुरुष होते.त्यांच्या विचारांनी आजच्या पिढीला नवसंजीवनी मिळते.” याप्रसंगी शाळेतील वातावरणात चैतन्याची लहर होती. कार्यक्रमाचा शेवटी सर्वांनी ‘जय भीम’च्या घोषणांद्वारे परमपुज्य डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना सलाम केला.हा क्षण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.उपस्थितांनी या दिवशी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची नव्याने उजळणी करत,त्यांच्या मार्गदर्शनाखाली समतेच्या समाजाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक के. व्ही.सरवदे,ज्येष्ठ कवी रमेश बोर्डेकर,भारतीय बौद्ध महासभेचे राजाराम वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कुचेकर,कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक प्रा.रविंद्र नरहिरे,संचालक प्रणव नरहिरे,प्राचार्य व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे