धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.29 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 98 कारवाया करुन 74,050 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-सुनिल ज्ञानोबा लोमटे, वय 35 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव हे दि.29.03.2025 रोजी 16.50 वा. सु. तेर ते वाणेवाडी जाणारे रोडलगत असलेले वाडा कॉर्नर हॉटेलच्या बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 6,400₹ किंमतीची 80लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-दशरथ विश्वनाथ देडे, वय 69 वर्षे, रा. गोपाळवाडी ता. जि. धाराशिव हे दि.29.03.2025 रोजी 18.50 वा. सु. गोपाळवाडी येथे राहते घराचे पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 5,600 ₹ किंमतीची 70लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-दिगंबर शिवाप्पा देडे, वय 52 वर्षे, रा. साठे नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.29.03.2025 रोजी 17.30 वा. सु. साठेनगर मुरुम येथे अंदाजे 2,050₹ किंमतीची 20लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-तिपण्णा राघोजी, वय 49 वर्षे, रा. अचलेर ता. लोहारा ता. जि. धाराशिव हे दि.29.03.2025 रोजी 19.35 वा. सु. आपल्या राहते घराचे समोर अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 28 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-अतिश पांडुरंग दुनगे, वय 30 वर्षे, रा.तोरंबा ता.लोहारा जि. धाराशिव हे दि.29.03.2025 रोजी 17.00 वा. सु. तोरंबा येथे अंदाजे 1,900 ₹ किंमतीची 19 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-शायद अब्दुलगणी इनामदार, वय 42 वर्षे, रा.रहिमनगर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.03.2025 रोजी 16.30 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मझिक वाहन क्र एमएच 12 बी.एन.4734 हे नळदुर्ग बसस्थानक चे उजव्या गेटसमोर रोडवर नळदुर्ग येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-नितीन झुंबर गपाट, वय 43 वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी जि. धाराशिव यांचे इंदापुर शिवारातील शेत गट नं 37 मध्ये ज्वारीचे कनसे भरुन ठेवलेले 60 ते 65 पोते अंदाजे 30,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि. 28.03.2025 रोजी 22.00 ते दि. 29.03.2025 रोजी 10.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नितीन गपाट यांनी दि.29.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विठ्ठल माणिक साठे, उध्दव बालाजी साठे, गोविंद शाहुराज साठे, दादा शाहुराज साठे, बापु प्रभाकर नरसाळे, भास्कर ढोणे, व्यंकट रावसाहेब आळंगे सर्व रा. माकणी ता. लेाहारा जि. धाराशिव यांनी दि.26.03.2025 रोजी 18.45 वा. सु. छत्रपती शिवाजी चौकाजवळ परमेश्वर औटे यांचे दुकानाचे समोर माकणी येथे फिर्यादी नामे-भरत शाहुराज वाघमारे, वय 60 वर्षे, रा. माकणी ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पत्राचे शेड मारल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, हंटर व पट्टाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भरत वाघामरे यांनी दि.29.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 115(2), 352, सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1),(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अविनाश अमोल माने, चैतन्य माने, अभिजीत अमोल माने सर्व रा. अनसुर्डा ता. जि. धाराशिव यांनी दि.26.03.2025 रोजी 04.30 वा. सु. केशेगाव साखर कारखान्याजव पेट्रोपंप जवळ फिर्यादी नामे-आतृमाराम उर्फ जिवा ज्ञानदेव भोसले, वय 22 वर्षे, रा. अनसुर्डा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी फोन करुन आपण जळकोट येथे झालेले भांडण मिटवू घेवू असे म्हणून बोलावून घेवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आत्माराम भोसले यांनी दि.29.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 117(2), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तुळजापूर पोलीस ठाणे:मयत नामे-रत्नमाला संजय पवार, वय 40 वर्षे, प्रतिक्षा संजय पवार, वय 23 वर्षे, दोघी रा. करंजे ता. करमाळा जि. सोलापूर ह.मु. गवते प्लॉट तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.25.03.2025 रोजी 14.00 वा.सु. गवते प्लॉट येथे राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- पति संजय भास्कर पवार, रा. करंजे ता. करमाळा जि. सोलापूर ह.मु. गवते प्लॉट तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, सासरे भास्कर बाजीराव पवार, सासु सिंधुबाई भास्कर पवार, दिर प्रभुरामचंद्र भास्कर पवार, सर्व रा. करंजे ता. करमाळा जि. सोलापूर यांचे शारिरीक व मानसिक त्रासास कंटाळून व प्रतिक्षा हिचे ल्गन तिचे मनाविरुध्द केले होते त्या त्रासाला कंटाळुन रत्नमाला व प्रतिक्षा या दोघींनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भरत पांडुरंग खाटमोडे, वय 55 वर्षेद्व रा. केत्तुर नं 1 ता. करमाळा जि. सोलापुर यांनी दि.29.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
परंडा पोलीस ठाणे: मयत नामे-प्रकाश ज्ञानदेव सरवदे, वय 62 वर्षे, रा. वडणेर ता. परंडा जि. धाराशिव हे दि.28.02.2025 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. जवळ नि. येथे सरकारी दवाखान्याचे काही अंतरावर जवळा फाटा येथे रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 सी 2338 जात होते. दरम्यान खंडी क्रेशरचा टेम्पो क्रमांक एमएच 13 डी.क्यु.8838 चा चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून चुकीच्या दिशेन येवून प्रकाश सरवदे यांचे मोटरसायकलाल धडक दिली. या अपघातात प्रकाश सरवदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सत्यजीत दिक्षाबाई प्रकाश सरवदे, वय 55 वर्षे, रा. वडणेर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.29.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
अतिश वाघमारे यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
संकल्प ते सिद्धी’ अंतर्गत धाराशिव भाजपचा जनता दरबार