कळंब – जनकल्याण अर्बन को.बँक लि.कळंब ही नामवंत बँक असून या बँकेच्या मुख्यकार्यालयासह सात शाखा कार्यरत आहेत.या बँकेचा नावलौकीक दिवसेंदिवस वाढत असून या बँकेच्या केज जिल्हा बीड व अहमदपूर जि.लातूर या दोन शाखा उघडण्यासाठी रिझर्व्ह बँक आँफ इंडिया कडून परवानगी आदेश मिळाला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यात कळंब या तालुक्याच्या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या जनकल्यान अर्बन को.बँकने तिच्या कार्याचा अलेख दिवसेंदिवस वाढता ठेवून आजपर्यंत खातेदार, ठेवीदार,कर्जदार यांचा उदंड आशिर्वाद मिळवला आहे. बँकेनेही समाजाप्रती असलेली आपली बांधीलकी जपलेली आसल्याने बघता बघता धाराशिव,बीड,लातूर,सोलापूर या चार जिल्ह्यात आपला कार्यविस्तार केला व सात शाखांचे नवनिर्माण करून आपले कार्य विस्तारत ठेवले. सध्या कार्यरत असलेल्या कळंब,धाराशिव,तुळजापूर, लातूर,उदगीर,अंबाजोगाई,बार्शी या शाखेबरोबरच केज जिल्हा बीड व अहमदपूर जिल्हा लातूर या दोन शाखा उघडण्याची रिझर्व्ह बँकेकडून नुकतीच परवानगी मिळालेली आहे.यावेळी बँकेचे चेअरमन उमेशराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये हे सर्व श्रेय बँकेवर प्रेम करणाऱ्या खातेदार ठेवीदार,कर्जदारांचे असल्याचे सांगून त्यांनी त्यासर्वांचे आभार व्यक्त केले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे