धाराशिव (जिमाका) – सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रंग भारुडाचे,वारी लोककलेची या कार्यक्रमाचे आयोजन २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता विघ्नेश्वर मंदिरासमोर,छत्रपती शिवाजी महाराज चौक,उमरगा येथे करण्यात आले आहे.कृष्णाई उळेकर आणि संच हा कार्यक्रम सादर करणार आहे. लोककलेच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार हे करतील.अध्यक्षस्थानी आमदार प्रवीण स्वामी हे असतील. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान