August 9, 2025

शेतकऱ्याच्या नावावर देशाच्या तिजोरीची लूट – रामचंद्र सालेकर

  • संभाजीनगर – एका रुपयात प्रधानमंत्री पीक विमा हे सगळं फसवं असून शेतकऱ्याला पुढं करून कंपनीला दलाल बनून देशाची तिजोरी लुटण्याचा हा फंडा असल्याचे १ रुपयात काढलेल्या प्रधानमंत्री पीक विम्याबाबत आलेले अनुभव विषद करताना रामचंद्र सालेकर यांनी आपले अनुभव कथन केले. भारताची संपूर्ण तिजोरी शेतकऱ्याच्या या एक रुपयाच्या विम्याच्या नावावर ओरियंटल कंपनीच्या घशात घालून आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. एक हेक्टर ला बावण हजाराच्या विम्यासाठी शेतकऱ्याने १ रु. व सरकारने ६०५४ रु. त्या कंपनीला दिले आहे. या संपूर्ण भारत देशात किती हेक्टर जमीन असेल? किती अरोबो खरोबो देशाच्या तिजोरीतला पैसा त्या कंपनीच्या मढ्यावर टाकून देशाच्या तिजोरीची लूट केली असेल?२०२४ च्या निवडणुकीत या कंपनीच्या माध्यमातून या लुटीचा वापर होणार तर नाहीना अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली.त्यांनी पुढे सांगितले की पिकाच्या व शेतीच्या नुकसानीबाबत कंपनीने दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फक्त तास नं तास कॅसेट ऐकायला मिळायची “एक दबाव दो दबाव तीन दबाव,आपका कॉल हमारे लिए बहुमूल्य है, जल्द ही उपलब्ध होंगे” अशा कॅसेट ने बोर झालं की पिच्छा सोडून द्यावा लागे. या वर्षाला शेतकरी भयंकर संकटात आहे कुठे अतिवृष्टीने तर कुठे पाऊसच न पडल्याने तर कुठे रोगाने उभी पीक करपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन ज्यांचे फोन उचलले गेले अश्यांना कंपनी थोडाफार लाभ देईलही पण त्याचा दिंडोरा पिटवायसाठी त्यापेक्षाही सरकार कडून कितीतरीपट जाहिरातीवर उधळल्या जाईल.
    निवडणूकीमुळे या पीक विम्याकडे शेतकऱ्यांची आशा टिकून आहे असेही ते म्हणाले.
error: Content is protected !!