August 9, 2025

शहरातील लाभार्थ्यांना दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप

  • कळंब – दिवाळी सणानिमित्त कळंब तालुक्यातील ३७ हजार ७०७ पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व रेशन दुकानात शिधा पोहचला आहे. वितरित करावयाच्या आनंदाचा शिधाच्या दिवाळी किट तालुक्यास प्राप्त झाल्या आहेत. तहसीलदार मनिषा मेने यांच्या हस्ते दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी कळंब शहरातील लाभार्थ्यांना बागवान चौकातील व्ही.जी. राजमाने यांच्या रेशन दुकानात तहसीलदार मनिषा मेने यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले.
    यावेळी पुरवठा विभागाचे अव्वल कारकून रमेश मोरे,आबासाहेब लांडगे,रास्त भाव दुकान संघटनेचे अध्यक्ष एस.ए. बोंदर,उपाध्यक्ष ए.ए. मुळीक,अंकुश झोंबाडे,गणेश आडसूळ, पुर- विभागाचे कर्मचारी, रेशन दुकानदार उपस्थित होते. कळंब तालुक्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना दिवाळीसाठी आनंदाचा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. १०० रुपयात सहा वस्तू मिळणार असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. शहरातील सर्व रेशन दुकानात शिधा पोहचला असून हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. या किटमध्ये एक किलो साखर, एक लिटर तेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे अशा सहा वस्तू असून त्याची किंमत १०० रुपये इतकी आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कळंब तालुक्यातील सर्व गावांमधील सर्व कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरित करण्यासाठी पुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
error: Content is protected !!