कळंब – भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचा लॉयन्स कंपनीचा निर्धार करण्यात आला असून लॉयन्स कंपनीतर्फे परमपूज्य,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत, यंदाचा भीम जन्मोत्सव विविध उपक्रमांनी भरलेला असणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी वही-पेन वाटप आणि नागरिकांसाठी फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच,शहरातून भव्य दिव्य अशी जंगी मिरवणूक काढण्यात येणार असून,त्यात ढोल-ताशा पथके,बॅण्ड पथक,झांज पथक आणि आंबेडकरी चळवळीचे झेंडे फडकवत अनुयायी सहभागी होणार आहेत. लॉयन्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष कुणाल मस्के यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बलाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती समिती खालील प्रमाणे स्थापन करण्यात आली. अध्यक्ष – प्रतीक वाघमारे,उपाध्यक्ष- प्रशांत बारगुले,सचिव – रोहन कदम व सुरज वाघमारे,कोषाध्यक्ष – स्वरूप मस्के व अभिजीत कदम,सजावटप्रमुख -उमेश गायकवाड,चेतन गायकवाड, आनंद कदम,सल्लागार – धीरज शिंदे,रवी ढवळे,सचिन गुंड, मिरवणूकप्रमुख -सुधीर जगताप,अक्षय धावारे,प्रणव गायकवाड,लक्ष्मण कदम,अजित मस्के,समीर मस्के,रोहन कांबळे, अक्षय लांडगे,सुजल हौसलमल, अनिकेत मस्के,सुरज कांबळे, यश नरहिरे,प्रतीक निकाळजे , उदय जानराव,राहुल सावंत अनिकेत भालेराव,अजय लांडगे, जुबेर पठाण,तोहीत आत्तार, साहिल शेख,अभि मुळे,विशाल मस्के,शिवम शिरसट,अशी नेमणूक करण्यात आली. लॉयन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की,जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा द्यावा. उत्सवाच्या तयारीसाठी जोरदार नियोजन सुरू असून,या कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थितीही लाभणार आहे. भीम जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाजहिताचे कार्य घडावे आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचावा, असा कंपनीचा मानस आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून डिकसळ गावचे सरपंच नानासाहेब धाकतोडे,इंद्रजीत गायकवाड,सचिन गायकवाड,किरण मस्के,पॅंथर अशोक कसबे,कोंडीबा कसबे,अंगद बारगुले,कुंदन कदम,सनी मस्के,प्रमोद ताटे, समाधान बचुटे,किशोर मगर, रामदास गव्हाणे व विकी वाघमारे अविनाश वाघमारे,भैय्या मुंडे,डि. के.बॉस, इंजि.सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभले. यावेळी सूत्रसंचालन हे समीर मस्के उर्फ खलनायक यांनी केलं तर आभार प्रदर्शन पॅंथर अशोक कसबे यांनी केलं. या समितीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर