June 23, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.15मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 260 कारवाया करुन 2,35,300 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-तुळसाबाई गुलचंद राठोड, वय 60 वर्षे, रा. शिंगोली तांडा ता. जि. धाराशिव या दि.15.03.2025 रोजी 19.45 वा. सु. तेरणा कॉलेजच्या पाठीमागे सेवालाल कॉलनी धाराशिव येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-संजय रामा गायकवाड, वय 43 वर्षे, रा. बोध्द नगर ता. जि. धाराशिव हे दि.15.03.2025 रोजी 18.30 वा. सु संदीप प्रेमचंद बनसोडे यांचे घराचे समोर मोकळ्या जागेत बौध्द नगर धाराशिव येथे अंदाजे 22,800 ₹ किंमतीची 228 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.15.03.2025 रोजी 18.18 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत समर्थ नगर कडे जाणारे रोडचे बाजूला असलेले मोर कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यासमोर मोकळ्या जागेत धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजहंस संजय जोगी, वय 30 वर्षे, रा.उंबरे कोठा धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.18 वा.सु समर्थ नगर कडे जाणारे रोडचे बाजूला असलेले मोर कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यासमोर मोकळ्या जागेत धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 840 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले.तर यावेळी आरोपी नामे-शिवशंकर भगवान खानापुरे, वय 58 वर्षे, रा.देशपांडे गल्ली दर्गा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.00 वा.सु स्टेडीएम रोडचे कडेला सम्राट बारचे पाठीमागे धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • परंडा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.15.03.2025 रोजी 17.00 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत गोल्डन चौक परंडा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गौस वजीर शेख, वय 29 वर्षे, रा.मोमीन गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे 17.00 वा.सु गोल्डन चौक परंडा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले परंडा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढोण पोलीसांनी दि.15.03.2025 रोजी 16.00 वा. सु. शिराढोण पो ठाणे हद्दीत कळंब ते लातुर जाणारे रोड वरील बळीराजा हॉटेलच्या पाठीमागील बाजूस अशोक कल्याणराव साळुके यांचे शेत गट नं 300/2 आंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत घारगाव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-दिनकर बाबुराव जाधव इतर 11 हे 16.00 वा.सु कळंब ते लातुर जाणारे रोड वरील बळीराजा हॉटेलच्या पाठीमागील बाजूस अशोक कल्याणराव साळुके यांचे शेत गट नं 300/2 आंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत घारगाव येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 11,210 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-मेजाफर यासीन सय्यद, वय 28 रा. इंदापुर जि. पुणे यांनी दि.15.03.2025 रोजी 05.50 वा.सु.सोलापूर ते धुळे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र 52 रोडवर तेरखेडा ब्रिजवर अशोक लिलॅड कंपनीचा टेम्पो क्र एमएच 12 एनएक्स 5225 मध्ये गोवंशीय जातीचे 43 वासरे,वाहनासह एकुण 2,43,000₹ किंमतीचे वासरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम 325, सह कलम 5, 5(अ), (1) (2), 5(ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 3, 11(1)(डी)(एफ)(एच)(के) सह 119 म.पो.अधि सह कलम 83/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • मुरुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-लाडाप्पा मारुती कालेकर, वय 49 वर्षे, रा.गणेश नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांचे मुरुम मोड जाणारे रोडवरील हॉटेल धाबा कालेकर मधील किचनचा दरवाचा आरोपी नामे- मनोज उर्फ मन्या प्रकाश पोतदार, वय 30 वर्षे, रा. यशवंत नगर मुरुम ता. उमरगा यांनी दि. 14.03.2025 रोजी 22.00 वा. सु. ते दि. 15.03.2025 रोजी 10.00 वा. सु.पत्रा उचकटून हॉटेलमधील रोख रक्कम 16,800₹ एक स्टीलच्या भाजी कापण्यासाठी बतई चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लाडाप्पा कालेकर यांनी दि.15.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334(1), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बाळु बबन बनसोडे, वय 30 वर्षे, रा. जुना सरकारी दावाखाना द्रावण भिमनगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 0409 ही दि. 25.01.2025 रोजी 21.30 जुना सरकारी दवाखाना भिमनगर परंडा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळु बनसोडे यांनी दि.15.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • भुम पोलीस ठाणे: मयत नामे-गणेश गौतम वारे, वय 36 वर्षे, रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव व सोबत त्यांचे मित्र सौरभ वारे हे दोघे दि.28.02.2025 रोजी 16.00 वा.सु.मोटरसायकल क्र एमएच25 एबी 6554 भुम ते पाथरुड रोडवर वरुन जात होते. दरम्यान बजाज पल्सर मोटरसायकल क्र एमएच 45 के 0376 चालक आरोपी नामे- कल्याण सुभाष काळे, रा. गोरमाळा फाटा ता. भुम जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून सौरभ वारे चालवत असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गणेश वारे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आश्रु गौतम वारे, वय 40 वर्षे, रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.15.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • लोहारा पोलीस ठाणे:मयत नामे-अलका उमाकांत माने व निकीता उमाकांत माने, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.14.03.2025 रोजी 11.00 ते 14.30 वा.सु. सास्तुर शिवारातील शेताजवळुन सास्तुर ते उदतपुर कडे जाणारे कूनलमधील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. आरोपी नामे- उमाकांत बाबुराव माने, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव यांचे सतत दारु पिवून विनाकारण मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रासास कंटाळून अलका व निकाता या दोघींनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मारुती लिंबाजी वाघमोडे, वय 70 वर्षे, रा. कुनाळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.15.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 107, 108, 85, 115(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 विनोद जानराव पोह/1003 वाघमारे,पोना/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/693 दहीहंडे, पोअं/प्रकाश बोईनवाड असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं 272/2024 कलम 394 मधील व इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे, रा.मोहा ता. कळंब जि. धाराशिव हा वडजी कडे जाणारे रोडचे बाजूस फटाक्याचे कारखान्याजवळ थांबलेला आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास मोटरसायकल सह ताब्यात घेवून त्याचे कडे असलेल्या मोटरसायकली बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटरसायकल ही त्याने धाराशिव येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व कुक्या उर्फ मोतीराम बादल शिंदे याचे सोबत मिळून आणखी बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणल्या असुन मोहा येथे पत्र्याचे शेडचे पाठीमागे लपवून ठेवल्या आहेत असे सागिंतले. त्यावर पथकाने नमुद मोटरसायकल सह दोन डिझेल कॅन्ड ताब्यात घेवून मोटरसायकल बाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे 1) आनंदनगर100/2025 भा.दं.वि.सं. कलम 303(2), 2)276/2020 कलम 379 भा.दं.वि.सं, नळदुर्ग 3) गुरनं 57/2025 कलम 3303(2) भा.न्या.सं.,4) गुरनं 83/2025 भा.न्या.सं. कलम 303(2), 5)पोस्टे धाराशिव शहर गुरनं73/2023 कलम 379, पोस्टे येरमाळा गुरनं 40/2025 303(2), पोस्टे गातेगाव जि. लातुर गुरनं23/2025 कलम 303 (2) या प्रमाणे गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष आरोपी नामे- सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे, रा.मोहा ता. कळंब जि. धाराशिव याचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील मोटरसायकल एकुण 1,61,510 ₹ किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
    सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक महेबुब अरब, पोअं/विनायक दहीहंडे,पोअं/प्रकाश बोईनवाड (TAW) सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!