भाटशिरपुरा- भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा येथे भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची 112 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सहशिक्षक एस.जी.सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याची माहिती देत असताना महाराष्ट्रात कृषी व औद्योगिक विकास तसेच सहकाराचे जाळे विणणारे व पंचायत राज च्या माध्यमातून तळागाळातील समाजाला लोकशाही ताकतीचे मान पटवून देणारे दृष्टीने नेते संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. तसेच ते ई बी सी चे सवलतीचे जनक म्हणून ओळखले जातात तसेच ते महाराष्ट्राचे शिल्पकार व सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याचा आदर्श महाराष्ट्र आणि देशाला देणारे यशवंतराव चव्हाण हे होते असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी एस.जी.सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन