कळंब – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि.१० मार्च २०२५ रोजी कळंब येथील आठवडी बाजार मैदानातील माळी लॅब येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक टी.जी. माळी यांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमास महात्मा फुले अर्बन क्रेडिट सोसायटीचे सचिव अरुण माळी,अध्यक्ष राजेंद्र खडबडे,राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष भोजने,भरत शिंदे,धोंगडे,शेळके, शिंदे,भास्कर कांबळे,पडवळ,ज्ञानेश्वर तोडकर, धीरज दुधाळ,आकाश माळी आदि उपस्थित होते.या प्रसंगी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे कार्यरत शिक्षक ज्ञानेश्वर तोडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी