कळंब – शहरातील रस्ते प्रकल्प व बांधकामांबाबत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ३ मार्च रोजी तातडीने स्थगिती आदेश दिला आहे.मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून कळंब नगर परिषदेच्या ठेकेदारांकडून कामे सुरूच ठेवण्यात येत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुणवंतराव कुंभार यांनी केला आहे.यासंदर्भात कुंभार यांनी मुख्याधिकाऱ्यांना अर्ज सादर केला असून,न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी,सर्व कामे थांबवावीत, अशी मागणी केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेली रस्ता कामेही थांबवण्याची विनंती केली आहे.न्यायालयाने संपूर्ण कळंब शहर हद्दीतील सर्व रस्ते प्रकल्प आणि बांधकामे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.जर हे आदेश पाळले नाहीत,तर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होऊ शकते,असे कुंभार यांनी सांगितले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले