धाराशिव – महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत दि.५ मार्च २०२४ रोजी त्रिरत्न बौद्ध महासंघाने राष्ट्रपतींना निवेदन दिले. याप्रसंगी त्रिरत्न बौद्ध महासंघ धाराशिवचे धम्मचारी आणि धम्म मित्र उपस्थित होते तसेच दुपारी ३:०० वाजता जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रसंगी धम्माचारी रत्नपालित, धम्माचारी ज्ञानपालित,धम्माचारी प्रज्ञाजित,धम्माचारी धम्मभूषण, धम्माचारी जिनोदय,धम्माचारी जिनाघोष आणि धम्ममित्र अजिंक्य मुरुमकर,प्रीती मनोहर, तेजस्विनी गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान