June 20, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.01 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 250 कारवाया करुन 2,12,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे:आरोपी नामे-रेश्मा आयरिंग्या भोसले, वय 35 वर्षे रा.डिकमळ पारधी पिढी तुळजापूर ह.मु. धारुर ता. जि. धाराशिव या दि.01.03.2025 रोजी 19.00 वा. सु. धारुर येथे अंदाजे 11,400 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 100 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.28.02.2025 रोजी 19.00 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत महाराष्ट्र चिकन सेंटर समोर वैराग नाका धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-इक्राम विक्रम शेख, वय 38 वर्षे, रा.गाजीनुरा फकीरा नगर, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.00 वा.सु महाराष्ट्र चिकन सेंटर समोर वैराग नाका धाराशिव येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-राहुल गौतम सुरवसे, वय 31 वर्षे, रा. भातंगही ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.01.03.2025 रोजी 01.30 वा.सु.लोहारा ते कास्ती खु. जाणारे रोडवर जोड आंबा फाटाजवळ छोटा हत्ती क्र एमएच 12 आर.एन.7680 या मध्ये दोन जर्सी गाय व एक खोंड वाहना सह एकुण 1,57,000 ₹ किंमतीचे जनावराचेअन्न पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतुक करत असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (डी), 11(1)(E), 11 (1) (एच) सह महाराष्ट्रपोलीस अधिनियम 119 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ गोवंशीय जनावरांचे पशुधनाचे शिर, पाय व इतर अवयवाचा साठा करुन ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-तौफिक शफिक कुरेशी, रा. मुंबई ह.मु. खॉजा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.01.03.2025 रोजी 14.45 वा. पुर्वी पिंपरी शिवार गट नं 118 व 14 मध्ये सिफा बोन मिल ॲड फर्टीलायझर कंपनीमध्ये नमुद आरोपी याने गोवंश जातीचे, इतर पशुधनाचे शिर, पाय व इतर अवयवाचा साठा करुन ठेवलेला असताना धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे महा. प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(क)(ड), 9(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “शस्त्र कायद्यांतर्गतगुन्हा नोंद.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुनिल बाळु देडे, वय 31 वर्षे, रा. चिंचोली ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी एक लोखंडी मुठ असलेला 70 सेमी लांबीचा प्राणघातक सुरा ज्याची मुठीचा सुरा हा बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून गावातील लोकामध्ये दहशत माजवत असताना तुळजापूर पोलीसांना दि.28.02.2025 रोजी 21.00 वा. सु. मिळून आला. यावरुन पथकाने नमुद सुरा जप्त करुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- दिलीप ज्ञानोबा हाजगुडे, वय 55 वर्षे, रा. रामवाडी ता. जि. धाराशिव यांचे शेत गटनं 03 मधील तेरणा नदीवरील 7.5 उच.पी.ची लाडा कंपनीची मोटार, कॉपर वायर व फिर्यादी यांचे शेजारील दोन पानबडी मोटार अज्ञात व्यक्तीने दि. 27.02.2025 रोंजी 01.00 ते 08.00वा. सु. चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिलीप हाजगुडे यांनी दि.01.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-सलमान दस्तगीर पठाण, रा. शिवशंकर नगर भुम व दोन अनोळखी इसम यांनी दि. 28.02.2025 रोजी 16.00 वा. सु. साहिल कॉम्पलेक्स जवळ आलमप्रभु पानटपरी समोर भुम येथे फिर्यादी नामे-वसीम नसीर मोगल, वय 29 वर्षे, रा. कसबा मोगलवाडा भुम ता. भुम जि. धाराशिव मागील भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वसीम मोगल यांनी दि.01.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक करणे.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- लता तुकाराम कोळेकर, वय 50 वर्षे, रा. मोर्डा ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि. 28.02.2025 रोजी 19.10ते ते 19.30 वा. सु. नविन बसस्थानक तुळजापूर येथे असताना अनोळखी दोन इसमांनी मावशी तुळजापूर मध्ये चोऱ्या होत आहेत दागिने घालून फिरु नका म्हणुन फिर्यादीस विश्वासात घेवून दागिने काढण्यास सांगून त्यावेळी लता कोळेकर यांनी त्यांचे गळ्यातील सोन्याचे दागिने 6 ग्रॅ वजनाचे पिशवीत ठेवल्याचे भासवुन फिर्यादीची फसवणुक करुन दागिने घेवून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लता कोळेकर यांनी दि.01.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-शामसुंदर कालिदास पाटील, वय 42 वर्षे, रा. न्यु बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.16.02.2024 रोजी 17.00 वा. सु.लातुर ते उमरगा रोडच्या कडेला माडज पाटी येथे रोडलगत उभा असताना मोटरसायकल क्र एमएच 12 जे.एफ. 3597 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून शामसुंदर पाटील यांना पाठीमागून धडक दिली. या. अपघातात शामसुंदर पाटील हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बकुळा शामसुंदर पाटील, वय 37 वर्षे, रा. न्यु बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे: मयत नामे-सागर भास्कर लोहारा व सोबत मित्र तुषार पोपळगट असे दि. 08.02.2025 रोजी 21.30 वा.सु. मोटरसायकल क्र एमएच22 ए.बी. 5423 वरुन जात होते. दरम्यान मराठा खानावळ समोर कळंब ते ढोकी रोडवर ट्रक क्र एमएच 12 डी.जे. 4621 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगयी व निष्काळजीपणे बंद अवस्थेत उभी केल्याने व ट्रकला कसलाही दिशा दर्शक फलक न लावल्याने पार्कींग लाई न लावल्याने रस्त्यावर उभी केल्यामुळे सागर लोहारा याची मोटरसायकल ट्रकला धडकून सागर लोहार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सतिश नारायण ढोणे, वय 28 वर्षे, रा. मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.01.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(2) 125(अ), 125 (ब) सह कलम 134(अ),134(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “लैंगीक अत्याचार.”
  • कळंब पोलीस ठाणे :एका गावातील एक 37 वर्षीय महिला (नाव- गावगोपनीय) दि. 27.02.2024 13.30 ते दि. 24.12.2024 रोजी 22.00 वा. सु. ही एकटी घरी असताना गावातीलच एका 35 वर्षीय तरुणाने तिचे एकटेपणाचा फायदा घेवून व फोनवर बोलल्याची कॉल रेकॉर्डींग व्हायरल करेल अशी धमकी देवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. नमुद तुरुणाचे पत्नीने नमुद महिलेस शिवीगाळ करुन मुलीस ही शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.01.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 64(एम), 351(4),352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!