कळंब – महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविघालयीन व समूह विघापीठे शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन/नविन शैक्षणिक धोरणा बाबतची कार्यशाळा गणेश कला क्रिडा मंच,स्वारगेट,पुणे येथे संपन्न होत आहे.या अधिवेशनात शासनाने केलेल्या कामाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे.त्याच बरोबर शिक्षकेत्तर कर्मच्या-यांचे जे काही प्रलंबीत प्रश्न आहेत त्या प्रश्नांनां वाचा फोडण्यासाठी व नविन शैक्षणिक धोरणा बाबतची माहीती ईत्यादी विषयावर अधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक,व आणखी काही मंत्री व आ.विक्रम काळे आणखी लोक प्रतीनिधी त्याच बरोबर प्रधान सचिव बी.वेणूगोपाल रेड्डी,राज्याचे शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन संपन्न होत आहे. त्याच बरोबर उच्च शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारी हे अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. या अधिवेशनाला राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकेत्तर बंधु भगिनी त्याच बरोबर सेवानिवृत्त कर्मच्यां-यानी उपस्थित रहावे,असे आवाहान संघटनेचे अध्यक्ष मेघराज पंडीत,विष्णू खोजे,रमेश पवार,सुरेश दाभाडे,संतोष मोरे,डाॅ.शिरीष देशमुख,अतुल मुंडे,सतिश जगताप,साळुंके व अजय जोशी,मारुती कदम, किशोर फावडे, कांबळे कुंदन बोराडे, रामलिंग जाधव,सुभाष शिंदे, नेताजी देशमुख, यशवंत पाटील,मारुती केचे व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे