February 9, 2026

शिवजन्मोत्सव सोहळा समीतीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

  • कळंब – कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समीतीच्या वतीने येथील रोकडेश्रवरी देवी मंदिरामध्ये दि.२०फेब्रुवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी खामसवाडी येथील ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदरील रक्त संकलनासाठी धाराशिव येथील सह्याद्री ब्लड बँकेला निमंत्रित केले होते. यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष अक्षय शेळके,सचिव डॉ.विकास शेळके,सदस्य दत्ता शेळके,रवी सावंत,श्रीकांत बाकले,संदीप बिडवे,विशाल शेळके,संतोष शेळके,ओम तेरकर ,प्रशांत शेळके यांनी परिश्रम घेतले.तर सह्याद्री ब्लड बँकेचे कर्मचारी ओमकार ढोने, राकेश पवार,ऐश्वर्या आडसुळ, गायत्री आंधळे,राधीका थोरात, सोहेल कोतवाल,शुभम सोनवणे यांनी रक्तदात्यांची योग्य तपासणी करून रक्त संकलनासाठी उपस्थित होते.
error: Content is protected !!