March 27, 2026

कै.भाई नारायणराव लोमटे विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

  • कळंब – कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा येथे दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला .
    दिवसभर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली.आजच्या स्वयंशासन दिनाच्या एक दिवशीय मुख्याध्यापक म्हणून कुमारी प्रिया जगताप हिने काम पाहिले. तर उपमुख्याध्यापक केशव खापे,साक्षी थोरात,ज्ञानेश्वर मस्के,कृष्णा फकीर,खुशी खापे, समृद्धी पाटील,प्रशांत बेडके व अभिषेक झोंबाडे यांनी कामकाज विविध पदाधिकारी म्हणून पाहिले.आज सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे उप प्राचार्य आप्पासाहेब मिटकरी , अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालाची जिल्हाध्यक्ष डॉ.गिरीश कुलकर्णी,जिल्हा समन्वयक अजय विद्य,तालुका समन्वयक सौ.क्रांती इखे,डॉ. मंजिरी खापे उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कै.डि.के.कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील इयत्ता आठवीच्या व नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे करून सर्व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी प्रमुख पाहुणे उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी,डॉ.गिरीश कुलकर्णी,अजय विद्ये,क्रांती इखे, डॉ.मंजिरी खापे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
    तसेच यावेळी एम.पावर संस्थेमार्फत सामान्य मानसिक आरोग्य याविषयी अजय वददी व सौ.क्रांती ईखे यांच्यामार्फत ताण तणाव विषयी पथनाट्य शाळेत सादर करण्यात आले आणि चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
    उपप्राचार्य अप्पासाहेब मिटकरी यांनी इयत्ता दहावी परीक्षेत जो विद्यार्थी प्रथम येईल त्या विद्यार्थ्यास अकराशे रुपयाचे बक्षीस जाहीर केले व त्यांनी लगेच रोख स्वरूपात शाळेकडे जमा केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रतिभा गायकवाड व राधिका पांचाळ यांनी केले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक एस.जी.सूर्यवंशी, एच.ए.पानढवळे,बी.व्ही.ओव्हाळ,एस.एस.डिकले व शिक्षकेतर कर्मचारी विनायक शिंदे व विनोद चाळक यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!