कळंब – कुळवाडी भूषण,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सा.साक्षी पावनज्योत या विशेषांकाचे प्रकाशन दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी कळंब शहरातील राजमाता जिजाऊ चौकात मोठ्या उत्साहात पार पडले.या सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प महादेव महाराज अडसूळ हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप,काँग्रेसचे शहाजहान शिकलगार,माजी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन एस, के,पुरी,संपादक सुभाष घोडके,व्यावसायिक विशाल ठोंबरे,अच्युत मंडाळे,दिनेश बर्वे, अमन शेख,सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब धाकतोडे,शुभम गायकवाड,प्रशांत गायकवाड,श्रीकांत धाकतोडे आदी वाचकांची उपस्थिती होती. या अंकातून लेखामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, प्रशासन कौशल्य आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर लेखन केलेले आहे. या विशेष अंकात शिवाजी महाराजांच्या कार्याचा विविध पैलूंनी मागोवा घेण्यात आला असून,तो वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी सा.साक्षी पावनज्योत कायदेशीर सल्लागार अड.शकुंतला फाटक व संपादक माधवसिंग राजपूत,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
“कामगार चळवळीचा कणखर आधारवड हरपला” — अच्युतराव माने पाटील यांचे निधन
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज