धाराशिव – व्ही.पी.कॅम्पस, धाराशिव येथील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षातील वैशाली मुंडे,खिजरा पठाण आणि जिशान शेख या तीन विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय जर्नल- ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अँड अनालिटिकल रिव्हीवज’ (IJRAR) या नामांकित जर्नल मध्ये “नीड फॉर अँटीमयक्रोबिअल स्टेवॉर्डशीप इन इंडियन हेल्थकेअर सिस्टिम प्रायमरी अँड सेकंडरी केअर हॉस्पिटल्स” या विषयावर रिसर्च पेपर प्रकाशित झाला. या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी MOH इंडिया आणि WHO च्या गाइडलाइन्सनुसार अँटिमाइक्रोबियल स्टीवर्डशिपची प्राथमिक आणि दुय्यम काळजी रुग्णालयांमध्ये का गरज आहे याचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील प्रा.शमा महाडिक,गौरव बागल,मंगेश निंबाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.ननवरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या संशोधन कार्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रा.डॉ. तांबोळी सोहेल यांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान