कळंब – सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांच्या एकसष्टी निमित्त पर्याय संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि निबंध स्पर्धा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर पहिला गट इयत्ता ५ ते ७ आणि दुसरा गट इयत्ता ८ ते १० वी अशी असून तालुक्यातील प्रत्येक शाळेवर दिनांक ५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत घेण्यात येणार आहे.उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यातून प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक काढून पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळेत स्पर्धा घेण्यासाठी पर्याय संस्थेचे कार्यक्रम समन्वयक आश्रूबा गायकवाड यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले