August 9, 2025

वाढदिवसाच्या निमित्ताने कर्तृत्वाची थाप – सुभाष घोडके

  • कळंब – वाढदिवस हा फंडा नसून त्यानिमित्ताने केलेल्या कर्तृत्वाची पाठीवर थाप मारून त्या व्यक्तीस काम करण्याची ऊर्जा देण्याची संधी मिळते असे हृदयस्पर्शी भावना प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी प्रस्तावनेतून व्यक्त केले.
  • दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी दिलीप गंभीरे यांच्या ४९ व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता साक्षी कोचिंग क्लासेसच्या सभागृहात महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शाल,पुष्पहार, सुभाष घोडके लिखित विरंगुळा पुस्तक आणि सन्मानपत्र देऊन मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला.
  • यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,शिक्षक राजेंद्र पवार,पत्रकार माधवसिंग राजपूत,समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे आदींनी पत्रकार दिलीप गंभीरे यांना मनोगत पर शुभेच्छा दिल्या.

  • दिलीप गंभीरे यांची लेखणी वास्तवतेवर आधारित असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेशीवर टांगण्याचे काम करत असून सांप्रदायीकतेचा वारसा असल्याचे अध्यक्षीय भाषणातून महादेव महाराजांनी सांगितले.
    या कार्यक्रमाचे भारदस्त असे सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर महेश फाटक यांनी आभार मानले.
error: Content is protected !!